Zero Hour Nashik Mahapalika : गोदामाय कोण प्रदुषित करतंय? नाशिक महापालिकेचे मुद्दे काय?
abp majha web team | 06 Mar 2025 09:41 PM (IST)
Zero Hour Nashik Mahapalika : गोदामाय कोण प्रदुषित करतंय? नाशिक महापालिकेचे मुद्दे काय?
उगमस्थान नंतर गोदावरी ज्या ज्या मार्गाने प्रवाहित होते, त्या सर्व ठिकाणी गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे, गोदा पात्रात वाढलेल्या पानवेलींनी गोदावरीचा श्वास कोंडला गेला आहे, नाशिक शहरानंतर निफाड तालुक्यांतून गोदावरीचा प्रवास सुरु होतो, मात्र याच निफाड तालुक्यात गोदावरीच्या प्रदूषणाचे भीषण वास्तव समोर आहे आहे. गळ्यातील नेकलेस प्रमाणे गोदावरी वळण घेत मार्गस्थ होते मात्र या सम्पूर्ण मार्गात गोदावरीचे पाणी दिसतच नाही, अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे गोदावरीत पानवेली वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. 2/3किलोमीटर अंतरावर फक्त पानवेलीच नजरेस पडत आहेत, स्थानिक नागरिक स्वामी नाठे यांनी ड्रोनच्या माध्यमातून गोदावरीचे हवं दृश्य टिपले आहे.
- मुख्यपृष्ठ
- टीवी शोज
- झीरो अवर
- Zero Hour Nashik Mahapalika : गोदामाय कोण प्रदुषित करतंय? नाशिक महापालिकेचे मुद्दे काय?
TRENDING VIDEOS
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.