✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : विदर्भातल्या पाच मतदारसंघांत अर्ज दाखल; नितीन गडकरी, राजू पारवेंसह दिग्गजांनी भरला अर्ज

abp majha web team   |  27 Mar 2024 10:43 PM (IST)

Zero Hour : विदर्भातल्या पाच मतदारसंघांत अर्ज दाखल; नितीन गडकरी, राजू पारवेंसह दिग्गजांनी भरला अर्ज 


लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, आणि भंडारा-गोंदिया हे पाच लोकसभा मतदारसंघ आहेत. या पाचही ठिकाणी उरलेल्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल झाले. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत आज अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रफुल पटेलही उपस्थित होते. गडकरी यांंच्याविरोधात काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी काल उमेदवारी दाखल केलीय. चंद्रपुरात काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांनी आज अर्ज दाखल केला. त्यांची लढत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी होणार आहे. भंडारा गोंदिय़ात भाजपकडून सुनील मेंंढे यांनी तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळेंनी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिय़ातच वंचितचे संजय केवटही रिंगणात आहेत. गडचिरोलीतून वंचितचे राजेश बेले यांनी आज अर्ज दाखल केला तर काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनीही आज अर्ज दाखल केलाय. भाजपच्या अशोक नेतेंनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर रामटेकमध्ये शिवसेना उमेदवार राजू पारवे यांनीही आज अर्ज दाखल केला. १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील या पाच जागांसाठी मतदान होणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : विदर्भातल्या पाच मतदारसंघांत अर्ज दाखल; नितीन गडकरी, राजू पारवेंसह दिग्गजांनी भरला अर्ज

TRENDING VIDEOS

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?1 Hour ago

Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण1 Hour ago

Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग2 Hour ago

Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?2 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.