✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Suresh Dhas on Beed : बीड बनतंय का 'गँग्स ऑफ वासेपूर'? सुरेश धस EXCLUSIVE

विजय साळवी, एबीपी माझा   |  24 Dec 2024 09:39 PM (IST)

नमस्कार मी विजय साळवी... झीरो अवर या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.. 


मंडळी, एखादं शहर... एखादं गाव.. एखादं राज्य... किंवा अगदी एखादा देशही... यांची तिथल्या वैशिष्ट्यांनुसार एक विशिष्ट ओळख असते.. 


मंडळी.. पाकिस्तान किंवा चीन म्हटलं ना की ते दोन्ही देश आपल्या कुरापतींसाठी प्रसिद्ध आहेत.. तसंच अमेरिका आणि रशिया त्यांच्या सामरिक शक्तीसाठी तर इंग्लंड त्यांच्या साम्राज्यासाठी... मंडळी, यात कधीकधी एखादी ओळख मिरवण्यासारखी असते... पण एखादी ओळख लाजिरवाणीही असू शकते...


अशीच काही बिरुदं आपल्या देशातही आहेत.. ती सांगताना एखाद्या राज्याचा अपमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नाहीय.. पण, वाढत्या गुन्हेगारीचं उदाहरण देताना आपले राजकारणी एखाद्या शहराची किंवा राज्याची तुलना उत्तरेतील राज्यांची नावं घेऊन करतात..


नेत्यांच्या भाषणांपासून अगदी चित्रपटांपर्यंत काही राज्यं ही फक्त गुन्हेगारीसाठीच प्रसिद्ध आहेत.. असंच सांगण्यात आलंय.. दाखवण्यात आलंय..


आता तुम्ही म्हणाल की हे मी का सांगतोय.. तर मंडळी.. त्यांचं कारण आहे.. 
ते म्हणजे सोळा दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाच्या सरपंचाची म्हणजे संतोष देशमुखांची झालेली निर्घृण हत्या..


आणि आज सोळा दिवसांनंतरही या घटनेवरून सुरु झालेलं राजकारण थांबलेलं नाही...


घटना एका गावाची... एका जिल्ह्याची जरी असली.. तरी त्यावरुन अवघ्या राज्याचं राजकारण पेटलंय..


बरं, फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप असते.. तर मी शहरांच्या वेगवेगळ्या बिरुदांचा इतिहास तुम्हाला सांगितला नसता.. पण, बीडच्या हत्याकांडावरून सुरु झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपात आपल्या शहरांची तुलना गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यांशी केली जात आहे. आणि हा नक्कीच एक चिंतेचा मुद्दा आहे.. आधी पाहूयात विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय?

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Suresh Dhas on Beed : बीड बनतंय का 'गँग्स ऑफ वासेपूर'? सुरेश धस EXCLUSIVE

TRENDING VIDEOS

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी1 Hour ago

Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक1 Hour ago

Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष1 Hour ago

Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....2 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.