Zero Hour : चाणाक्ष नेते,उत्तम वक्ते,लाडके राज्यकर्ते; Atal Bihari Vajpayee सारखा नेता होणे नाही...
विजय साळवी, एबीपी माझा | 25 Dec 2024 11:00 PM (IST)
मंडळी आजच्या अतिशय कटू आणि ध्रुवीकरण झालेल्या राजकारणात एकच नेता असा होता ज्यांचं नाव सगळेच आदरानं घेतात. आणि ते नाव म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. नेता, राज्यकर्ता आणि कवी सुद्धा... अटलजींची एक ओळख सांगणं शक्यच नाही. अटलजी भाजपचे सहसंस्थापक असून देखील आज काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष त्यांचं नाव अदबीनं घेतात. त्यांच्याबद्दल कुणी वाईट बोलतंय, कटू आठवणी सांगतंय असं कधीही होत नाही. याचं कारण म्हणजे अटलजी हे माणूस म्हणून उमदे होते, आणि सर्वांना अतिशय मायेनं वागवायचे. राजकीय मतभेद अलाहिदा, पण अटलजींनी कधी कुणावर वैयक्तिक टीका केल्याचं ऐकिवात नाही. अशा सर्वांच्या लाडक्या अटलजींची आज १००वी जयंती.. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, कारकीर्दीचा आणि हळव्या मनाचा एक धावता आढावा पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.