✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Shiv Sena vs BJP Zero Hour:ठाण्यात शिंदेंना भाजपकडूनच आव्हान?शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांचा दरबार

विजय साळवी, एबीपी माझा   |  29 Jan 2025 09:24 PM (IST)

मंडळी, राजकारण गा खेळ मोठा गमतीदार आहे. राजकारणात कधीकधी आपल्या माणसांनाही आव्हान द्यावं लागतं, आणि कधीकधी प्रतिस्पर्ध्याला जवळ करावं लागतं. 


आता तुम्ही म्हणाल, आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हे तत्वज्ञान का सांगतोय. कारण अर्थातच महाराष्ट्राचं राजकारण. भाजपच्या एका निर्णयामुळं शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या बालेकिल्ल्यातच कोंडी होते की काय असा प्रश्न पडू लागलाय.. 


आता फार कोड्यात बोलत नाही. आजचा विषय उलगडून सांगायचा तर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक यांनी लवकरच ठाणे शहरात जनता दरबार भरवण्याचं ठरवलंय. ठाण्याच्या सुप्रसिद्ध गडकरी रंगायतनमध्ये नाईक जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत. 


आता कुणी म्हणेल त्यात काय विशेष आहे?.. तर ऐका, नाईक हे राज्याचे वनमंत्री आहेत, त्यांचा ऐरोली हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यातच आहे.. जनता दरबार भरवला तर त्यात काय विशेष? पण मंडळी, राजकारण खरंच इतकं साधंसोपं असतं तर अजून काय हवं होतं? 


मंडळी, नोव्हेंबर २०२४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात १३२ जागा मिळाल्यानं अनेक राजकीय समीकरणं बदललीयत. मग महायुतीतली अंतर्गत समीकरणं त्याला अपवाद कशी असतील? आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू असताना शिंदे नाराज असल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीच्या वेळीही शिंदेंची नाराजी दिसून आल्याची राजकीय निरीक्षकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळं गणेश नाईकांची ही घोषणा त्याचीच परतफेड तर नाही ना, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Shiv Sena vs BJP Zero Hour:ठाण्यात शिंदेंना भाजपकडूनच आव्हान?शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांचा दरबार

TRENDING VIDEOS

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार5 Hour ago

Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार5 Hour ago

Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक5 Hour ago

Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?5 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.