Zero Hour : शिंदे-फडणवीस-दादांना आमंत्रण... पवारांची डिनर डिप्लोमसी आणि राजकारण
झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. आता आपण पाहणार राजकीय घडामोडी.. जागावाटपावरुन महायुती आणि मविआमध्ये नेमकं काय चाललंय.. कोणत्या पक्षाला किती जागा हव्यात.. वंचित आघाडीनं किती जागांची मागणी केलीय.. हे सगळं पाहणार आहोतच.. मात्र, सुरुवात करुयात बारामतीच्या बातमीनं.. कोणत्याही पक्षानं.. कोणत्याही आघाडीनं आतापर्यंत महाराष्ट्रातील लोकसभेसाठीची एकही उमेदवारी जाहीर केलेली नाहीय.. मात्र, असं असतानाच... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळेंनी बारामतीमधून आपली स्वताची उमेदवारी जाहीर केलीय.. ही बातमी सविस्तर पाहणार आहोतच.... हीच बारामती आणखी एका कारणासाठी गेल्या दोेन दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे.. आणि त्याला कारण ठरल्यात दोन पत्रिका.. पहिली अर्थात उद्या होणारा नमो रोजगार मेळावा.. आणि त्याच्या निमंत्रण पत्रिकेत नसलेलं शरद पवारांचं नाव.. आणि दुसरी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र.. आणि त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीसांनी दिलेलं उत्तर... हे सगळं पाहणार आहोतच.. मात्र, त्याआधी पाहुयात आजचा दुसरा प्रश्न..