Zero Hour : जागावाटपाचा तिढा महायुती कसा सोडवणार ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : जागावाटपाचा तिढा महायुती कसा सोडवणार ? जागावाटपाचा तिढा महायुती कसा सोडवणार हिंगोली, हातकणंगले या साखळीतील पुढचं गाव म्हणजे नाशिक... आणि हेमंत पाटील, धैर्यशील माने यानंतरचं नाव म्हणजे खासदार हेमंत गोडसे... पक्ष अर्थातच शिवसेना.. नाशिक मतदारसंघावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तिथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या ऐवजी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांच्या नावाची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे पुन्हा मुंबईत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. नाशिकची उमेदवारी आपल्य़ालाच मिळावी, या आग्रहाचा त्यांनी पुनरुच्चार केला असण्याची चर्चा आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर हेमंत गोडसेंनी नाशिकबाबत दिलेली प्रतिक्रिया पाहूया...