Zero Hour : ससूनरूग्णालयात आयसीयूमध्ये उंदीर चावल्याने रूग्णाचा मृत्यू ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : ससूनरूग्णालयात आयसीयूमध्ये उंदीर चावल्याने रूग्णाचा मृत्यू ? पुण्याचं ससून हॉस्पिटल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. इथे एक 30 वर्षांचा तरुण I.C.U. मधे उपचारांसाठी भर्ती होता. पण आयसीयूमध्ये उंदीर चावल्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केलाय. सागर रेणूसे नावाचा हा तरुण पुण्यातील भोर तालुक्यात अपघातग्रस्त झाल्याने 16 मार्चला त्याला ससुन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 मार्चला आय सी यू मध्येे त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला त्यानंतरच या तरुणाची प्रकृती खालावली असा आरोप नातेवाईकांनी केलाय. आज सकाळी सागरचं निधन झालं. मात्र नातेवाईकांच्या आरोपात तथ्य नसल्याचं ससून प्रशासनाने म्हंटलंय. मृत्यूमुखी पडलेला रुग्ण दारूच्या नशेत पुलावरून पडल्याने गंभीर जखमी झाला होता असं सांगत, या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं ससुनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी जाहीर केलय. या बातमीसोबत झीरो अवरमध्ये वेळ झालीय इथेच थांबण्याची