✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : Chandrababu Naidu आणि Nitish Kumar यांच्या पाठिंब्यानं दिल्लीतलं चित्र स्पष्ट

abp majha web team   |  06 Jun 2024 07:05 AM (IST)

Zero Hour : मोदींसोबत असणारे चंद्राबाबू, नितीशकुमार मोदींची साथ सोडतील ?
चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार पोहोचले.. आणि दोन्ही नेत्यांच्या भूमिकांवरच्या चर्चा शांत झाल्या..  मात्र, खरा प्रश्न होता तो नितीश कुमारांचा.. कारण, जेव्हा देशात लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरु झाली होती.. तेव्हा नितीश कुमारांनी मोदी विरोधकांच्या भेटी घेतल्या.. काँग्रेसच्या नेतृत्वात 28 विरोधी पक्षांना एकत्र आणलं.. नितीश कुमारांच्याच नेतृत्वात इंडि आघाडीचीही स्थापना झाली.. मात्र, ऐन लोकसभेच्या तोंडावर नितीश कुमारांनी इंडि आघाडीची साथ सोडली.. आणि भाजपच्या एनडीएत सामील झाले.. त्यांनी याआधीही किमान तीन वेळा भाजपची साथ सोडलीय.. आणि आता तर मोदींच्या हॅटट्रिकची चावी नितीश कुमारांच्या हातात आलीय.. अशा वेळी नितीश कुमार काय करणार.. यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न..
हा निवडणूक निकाल सगळ्यांना काही ना काही शिकवणारा ठरला.. 
ज्या मोदींनी देशभरात विकासकामांवर जोर दिला आणि ज्यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभा राहिलं.. ज्यांच्या कार्यकाळात काशी, मथुरेतील मंदिरं अतिक्रमणातून मुक्त होतील अशी देशातील हिंदूंना आशा होती त्याच मोदींचं वाराणसीत मताधिक्य मोठ्या प्रमाणात घसरलं..  २०१४ साली पावणे चार लाख, २०१९ साली पावणे पाच लाखांनी जिंकणाऱ्या मोदींना यावेळी फक्त दीड लाख मतांनी विजय मिळाला.    
सगळ्यात मोठी शिकवण, लोकसभेत सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या.. सर्वात मोठा पक्ष भाजपला मिळाली असेल..  मतदारांना गृहित धरु नका.. विरोधकांना हलक्यात घेऊ नका.. जुन्या मित्रांचा मान सन्मान राखा.. नवे मित्र जोडता आले नाहीत तरी चालेल पण जुन्या मित्रांना विनाकारण गमावू नका.. आपली विकास कामं जनतेपर्यंत पोहचतायत का याकडे लक्ष द्या..  आपली इमारत ज्या पायावर, ज्या कोअरवर मजबुत उभा आहे त्या छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांच्याा बलिदानाचा विसर पडू देऊ नका.. नवी टीम बनवण्याच्या नादात पक्षातील जुन्या सहकाऱ्यांना खड्यासारखं दूर सारण्याआधी दहा वेळा विचार करा..एकाच चेहऱ्यावर अवलंबून राहण्याचा अतिरेक टाळा.. गाफिल राहू नका..
खरंतर याच बाबी इतर सर्वच पक्षांना आणि नेत्यांनाही लागू होतील.. अगदी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा.. त्यांनी आज सरकारमधून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली त्यामागे उद्विगनता हे कारण आहेच. आपल्याकडून काही चुका झाल्यात यावर ते चिंतन करत असतील.. पक्षातील किती लोक दुखावल्या गेले असतील..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : Chandrababu Naidu आणि Nitish Kumar यांच्या पाठिंब्यानं दिल्लीतलं चित्र स्पष्ट

TRENDING VIDEOS

Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप56 Minutes ago

Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात2 Hour ago

Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report3 Hour ago

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report12 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.