Zero Hour : अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापलं, शिवसेना उबाठाचा अजित पवारांवर निशाणा
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 10:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापलं, शिवसेना उबाठाचा अजित पवारांवर निशाणा
लोकसभेच्या रणसंग्रामात, आज देशभरात पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला.. १९ एप्रिलला २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण, १०२ जागांसाठी मतदारराजा आपल्या मतदानाचा हक्क बजावणारय.. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे... नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर.. विदर्भातील या पाच जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेत.. यातील कोणत्या उमेदवाराला जनता कौल देते, हे ४ जूनला स्पष्ट होईलच.. आज जरी पहिल्या टप्प्याचा प्रचार संपलाय, तरी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे आणखी चार टप्पे पार पडायचे आहेत..