✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hourमुख्यमंत्र्यांनी झुकतं माप द्यावं,शाहांचं वक्तव्य,राजकीय विश्लेषक अभय देशपांडेंचं विश्लेषण

जयदीप मेढे  |  16 Oct 2024 09:41 PM (IST)
ABP News

Zero Hour : मुख्यमंत्र्यांनी झुकतं माप द्यावं, शाहांचं वक्तव्य राजकीय विश्लेषक अभय देशपांडे याचं विश्लेषण
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक दोनचे नेते अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्देशून एक महत्त्वाचं वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती आहे. तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं, त्यावेळी तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिंदेंनी मित्रपक्षाला झुकतं माप द्यावं, असं अमित शाह यांनी शिंदेंना सुचवल्याचं कळतं. अमित शाहांंचं हे वक्तव्य म्हणजे शिंदेंनी तिढा असलेल्या काही जागा भाजपसाठी सोडाव्यात यासाठी आवाहन होतं, की दबावतंत्र होतं यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. महायुतीत जागावाटपाची सर्वात मोठी संभाव्य अडचण म्हणजे तिन्ही घटक पक्षांना समाधान वाटेल इतक्या जागा प्रत्येक पक्षाला मिळणं. कारण २०१९ साली युतीत शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष होते. त्यावेळी भाजपनं १६४ मतदारसंघात उमेदवार दिले होते, तर तेव्हा एकसंध शिवसेनेनं १२४ जागा लढवल्या होत्या. यंदा महायुतीत दोनऐवजी तीन पक्ष आहेत. त्यामुळं प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागांची संख्या कमी होणार, हे निश्चित आहे. आणि तेच सर्वाधिक अडचणीचं आहे. सीटिंग म्हणजे विद्यमान आमदारांच्या जागा मागायच्या नाहीत हे जागावाटपाचं मुख्य सूत्र असलं, तरी पराभूत जागांचं वाटप कसं करायचं, यावर येऊन घोडं अडतं. आता अमित शाहांचा इशारा किंवा त्यांची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती गांभीर्यानं घेतात? तसंच लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधासभा निवडणुकीसाठीही महायुतीच्या जागावाटपाला उशीर होतो की जागावाटपाची घोषणा वेळेत होते, याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hourमुख्यमंत्र्यांनी झुकतं माप द्यावं,शाहांचं वक्तव्य,राजकीय विश्लेषक अभय देशपांडेंचं विश्लेषण

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.