✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कोण घेणार? मस्साजोगच्या गावकऱ्यांचा अल्टिमेटम?

विजय साळवी, एबीपी माझा   |  21 Feb 2025 11:33 PM (IST)

नमस्कार मी, अमोल जोशी.. एबीपी माझाच्या झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. गेल्या दोन महिन्यांपासून बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणात इतके टर्न अँड ट्विस्ट आलेत.. की त्यावरुन एक सस्पेन्स थ्रीलर वेब सीरिजही होईल.. आणि हेच टर्न अँड ट्विस्ट आजही सुरुच आहेत..

त्यातलही सगळ्यात पहिली गोष्ट घडली.. ती मस्साजोगमध्ये.. इथंही दोन गोष्टी घडल्यात.. त्यातली पहिली म्हणजे.. मस्साजोगच्या गावकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला एक अल्टिमेटम दिलाय.. त्यानुसार महाराष्ट्र सरकारसमोर काही मागण्या ठेवल्यात.. तावर सरकारनं २५ फेब्रुवारीपर्यंत ठोस भूमिका घेतली नाही तर मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संतोष देशमुखांचं कुटुंब... अन्नत्याग आंदोलन करणार आहे.. त्यांच्या मागण्या काय आहेत.. हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत..
आता मस्साजोगमधली आजची दुसरी गोष्ट.. जेव्हा गावकऱ्यांनी आंदोलनाची घोषणा केली.. तेव्हा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी यांनी मस्साजोग गाठलं.. सकाळीच जरांगे मस्साजोगमध्ये पोहोचलचे आणि त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली.. आणि गावकऱ्यांनी आंदोलनं मागे घ्यायला हवं अशी विनंती केली.. पण, गावकऱ्यांनी ती मान्य केली नाही.. आणि आंदोलनावर ठाम राहिलेत.. आणखी एका गोष्टीवरुन गावकऱ्यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरागेंनीची एक मागणी फेटाळलीय.. त्य़ाचसोबत आज दिवसभरात मस्साजोगमध्ये काय काय घडलंय हेही आपण आज पाहणार आहोतच..

पण,त्याआधी आज दिवसभरातली दुसरी मोठी गोष्ट... तीही मस्साजोग आणि धनंजय मुंडेंसंदर्भातलीच आहे.. गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडेंच्याविरोधात वेगळ्याच आघाडीवर मोर्चा सांभाळणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांवरच आज गंभीर आरोप केलेत.. तेही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोशल मीडिया एक पोस्ट केली.. त्यात त्यांनी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केलाय.. त्यावर अंजली दमानियांनीही पलटवार केलाय. तेही आपण आजच्या भागात पाहणार आहोत..

आता आज दिवसभरातली तिसरी मोठी गोष्ट.. तीही मस्साजोगमधूनच.. गेल्या ४८ तासांमध्ये मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा या मागणीनं जोर धरलाय.. सुप्रिया सुळे, संजय राऊत, मनोज जरांगे, हर्षवर्धन सपकाळ, अंजली दमानिय़ा, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांंच्यासह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.. प्रत्येकांनं वेगवेगळ्या मंचावरुन केलेल्या मागण्यांवरुन राजकारणही पेटलंय.. पण, जिथं आज मस्साजोगच्या गावकऱ्यांनी उपोषणाची घोषणा करत सरकारला अल्टिमेटम दिलाय.. त्याच मंचावरुन मनोज जरागेंनी एक मागणी केली.. ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा... आणि याच मागणीवर आहे आपला आजचा प्रश्न.. आणि तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला..

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कोण घेणार? मस्साजोगच्या गावकऱ्यांचा अल्टिमेटम?

TRENDING VIDEOS

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती1 Hour ago

Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report2 Hour ago

Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report3 Hour ago

Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report4 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.