ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Santosh Deshmukh case : बीड हत्याकांड ते धनंजय देशमुखांचा नवा आरोप; दिवसभरात काय काय घडलं?

Zero Hour Santosh Deshmukh case : बीड हत्याकांड ते धनंजय देशमुखांचा नवा आरोप; दिवसभरात काय काय घडलं?

विजय साळवी, एबीपी माझा Updated at: 03 Feb 2025 09:34 PM (IST)

नमस्कार, मी विजय साळवी... एबीपी माझाच्या झीरो अवर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत...  


मंडळी, मुंबईपासून बरोबर ५०१ किलोमीटर अंतरावर असलेलं बीड जिल्ह्यातील मस्साजोग हे गाव.. बरोबर ५६ दिवसांपूर्वी एका निर्घृण हत्येनं हादरलं.. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेभोवती महाराष्ट्रातलं राजकारण आणि समाजकारणही वेगान फिरतंय...


संतोष देशमुखांच्या हत्येविषयी गेल्या ५६ दिवसांमध्ये शेकडो खुलासे झाले.. पण त्याभोवती वेगानं फिरणारं महाराष्ट्राचं राजकारण अजूनही थांबलेलं नाही... राज्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर आजही याच विषयाचा इम्पॅक्ट आहेच...


या हत्याकांडानंतर सुरु असलेल्या मालिकेत आजही अनेक घटना घडल्या.. पहिली गोष्ट फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्यासंदर्भातली.. आज घटनेच्या ५६व्या दिवशीही आरोपी कृष्णा आंधळे फरारच आहे.. या प्रकरणावरून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी गंभीर आरोप केलेत.. कृष्णा आंधळेला लवकर अटक केली नाही तर तो पुुरावे नष्ट करेल अशी भीती धनंजय देशमुखांनी व्यक्त केली आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे कुठेही गेलेला नसून त्याला लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी केलाय.


दुसरी घडामोड त्याच मनोज जरांगेंनी केलेल्या गौप्यस्फोटाची... मनोज जरांगेंनी आज छत्रपती संभाजीनगरमधून मोठा गौप्यस्फोट केलाय... विधानसभा निवडणुकीआधी धनंजय मुंडे रात्री दोन वाजता आपल्या भेटीसाठी आले होते, अशी माहिती जरांगेनी दिली. त्यांच्यासोबत वाल्मिक कराडही होता, असं जरांगेंनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी सांभाळून घ्या, लक्ष असून द्या असंही म्हटल्याचं जरांगेंनी स्पष्ट सांगितलं.. यावेळी धनंजय मुंडे आपल्या पाया पडल्याचाही दावा जरांगेंनी केला.


आता तिसरी बातमी... मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या चार दिवसांत धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नसल्यानं तर आपण धनंजय मुंडेंबद्दल मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे... तसंच पुरावे भगवानगडावर पाठवून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी विनंती नामदेवशास्त्रींना करणार असल्याचंही दमानियांनी सांगितलं... दस्तुरखुद्द अंजली दमानिया थोड्याच वेळात आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी आजची चौथी घडामोड...


ही घडामोड आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासंदर्भातील.. दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेवशास्त्रींचे आशीर्वाद घेतले.. त्यानंतर नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंना क्लिनचीट देऊन... आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याची घोषणा केली.. त्यानंतर नामदेवशास्त्रींवर चौफेर टीका सुरु झाली.. आणि ती आजही सुरु आहे... माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्याचसंदर्भात बोलत असताना काय विधान केलं, आपण ते आधी पाहूयात..

TRENDING VIDEOS

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha1 Day ago

Yasmin Shaikh Marathi grammar | 'यास्मीन शेख' नावामुळे चकित होणारे विद्यार्थी आणि व्याकरणाचे प्रेम!1 Day ago

Marathi News | Mate Master च्या शिकवणीने Damle's Adarsh Marathi Vyakaran झाले सोपे!1 Day ago

Independence Day | १५ ऑगस्ट १९४७ चा अविस्मरणीय अनुभव1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.