✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Sanjay Raut Full : संजय राऊत यांच्यामुळे ठाकरे गट संपेल? महाजनांचा दावा खरा की खोटा?

abp majha web team   |  03 Jun 2025 11:11 PM (IST)

गद्दार, भोंगा, दलाल असे शब्द आपण खरं तर कुणासाठीच वापरणार नाही. कारण आपण सामान्य माणसं तसं जरा संस्कृती-बिंस्कृती पाळत असतो. कुणाशी कसं बोलायचं याचे संकेत आपण मानत असतो. मात्र, आपल्या राजकारण्यांनी याबाबत सगळंच सोडून दिलंय असं वाटण्यासारखी स्थिती आहे. त्यात आता महापालिका निवडणुकाच तोंडावर असल्यानं असे शाब्दिक फटाके आणि लवंग्या रोज फुटणार हे तर उघडच आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे संजय राऊतांची ताजी वक्तव्य. आता तुम्ही विचाराल की संजय राऊतांची वक्तव्य तर आम्ही रोज पाहतो, ऐकतो....त्यात काय आता नवीन? तर नवीन आहे ती परिस्थिती आणि राऊतांनी गाठलेलं नवं सावज. मघाशी म्हटल्याप्रमाणे सध्या महापालिका निवडणुकांचा मौसम आहे आणि मुंबई, पुण्याखालोखाल नाशिक महापालिकाही प्रतिष्ठेची आहे. याच नाशिकमध्ये एका लग्नाला जमलेल्या या संजय राऊत आणि गिरीश महाजन या राजकीय व-हाड्यांमध्ये कलगीतुरा रंगला. यात महाजनांनी संजय राऊतांमुळे शिवसेना संपेल अशी टीका केली तर राऊतांनी महाजनांना पक्ष फोडणारा दलाल म्हटलं. आता या वादाला पुन्हा नाशिकच्या मिसळीच्या तर्रीसारखा झटका दिला तो ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बडगुजर यांनी. नाशिकमधील पक्षांतर्गत बदलामुळे मी माझ्यावरच नाराज आहे, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. इथं हे लक्षात घ्यायला हवं की राऊत हे ठाकऱ्यांच्या शिवसेनेचे नाशिक संपर्क प्रमुख आहेत. विशेष म्हणजे राऊत नाशकात असताना बडगुजर मात्र मुख्यमंत्री फडणवीसांकडे काही मागण्यांचं पत्र घेऊन गेले होते. या सर्वच घडामोेडींमुळे महाजनांच्या टीकेवरुन एक प्रश्न उपस्थित होतो...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Sanjay Raut Full : संजय राऊत यांच्यामुळे ठाकरे गट संपेल? महाजनांचा दावा खरा की खोटा?

TRENDING VIDEOS

Baramati Adani Group and Pawar Family : अदानींचं कारण, पवाराचं मनोमिलन, बारामतीत काय घडलं?43 Minutes ago

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?3 Hour ago

Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'6 Hour ago

Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात6 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.