Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour RSS Campaign for BJP : भाजपच्या सत्तेमागचा किंगमेकर 'आरएसएस'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागलेय हे सांगायची गरज नाही .... पण अनेकांना माहिती नसेल कि तेवढ्याच ताकतीने या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हि कामाला लागलाय. आरएसएस आणि त्यांच्याशी संबंधित सर्व संस्था, संघटनांची समन्वय बैठक देशभरात.. जिल्ह्या जिल्ह्यात झाली.. या बैठकीनंतर, संघ आणि संघ परिवारातील तब्बल ३६ संघटना भाजपसाठी कामाला लागल्या आहेत.. मतदाता जागृती अभियानांतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक... घरोघरी जावून लोकांना मतदान प्रक्रियेत अधिक सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करतायत.. संघाचे स्वयंसेवक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करतायत.. उद्देश एकच... भाजपला आणि एनडीएला ४०० जागा मिळवून देणे.. पण .... पण ... जर तुम्हाला वाटत असेल कि संघ घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपासाठी मतं मागतोय ... तर असं मात्र बिलकुल नाही.
मग अनेकांना अप्रश्न पडू शकतो कि संघ नक्की काय करतोय .... तर राष्ट्रीयत्वाचा विचार समोर ठेऊन कोणाला मतदान करणे आवश्यक आहे हे सांगितलं जातंय.. मोदी सरकारने गेल्या १० वर्षांमध्ये अयोध्या राम मंदिर, कलम ३७०, सीएए, तिहेरी तलाक यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना तडीस नेलंय.. मोदीच पुन्हा पंतप्रधान होणे कसे आवश्यक आहे? हे पटवून देण्यासाठी संघाचे स्वयंसेवक विविध समाजघटकांशी संपर्क करतायत.. कशाप्रकारे संघाचा प्रचार सुरू आहे, ते ऐकूया अशाच कार्यरत स्वयंसेवकांकडून..