Zero Hour Guest Centre Rohit Pawar : शरद पवार गटात इनकमिंग का वाढतंय? रोहित पवार EXCLUSIVE
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाडकी बहीण योजनेतला घोटाळा... मंत्रिमंडळाच्या बैठकीतील आकर्षण घोषणाचा पाऊस.. यावर महायुती सरकारवर सातत्यानं आरोप करणाऱे आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. याशिवाय शरद पवारांच्या वाढलेल्या भेटीगाठींवरही त्यांचं मत जाणून घ्यावं लागेल.. कारण, विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांच्या भेटीसाठी सध्या गावोगावी राजकीय नेत्यांची रीघ लागलीय.. शरद पवारांना आज भेटलेल्या नेत्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचाच अधिक भरणा होता...
त्यामुळं विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठं इनकमिंग होणार असल्याची चर्चा आहे... अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या बबनदादा शिंदे आणि विलास लांडेंनी शरद पवारांची भेट घेतली. काल अकलूजमधल्या कार्यक्रमात भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही शरद पवारांच्या स्टेजवर दिसून आले. पाहुयात
महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया आणि सगळ्या राजकीय घडामोडींनंतर विरोधकांची बाजू जाणून घेणंही महत्वाचं ठरतं.. आणि त्यासाठीच आपल्यासोबत चर्चा करण्यसाठी आहेत.. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार... त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जावूयात गेस्ट सेंटरला...
रोहितजी, शरद पवार अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत जामखेडमधल्या खर्डा येथे विविध विकासकामांची उद्घाटन आणि लोकार्पणं करण्यात आली. त्यावेळी रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असं म्हणून पवारांनी तुमच्या मंत्रिपदाचे संकेत दिले असं म्हणायचं का?