Zero Hour : स्वत:ला हिंदू म्हणणारे हिंसा द्वेष पसरवतात, राहुल गांधी लोकसभेत बरसले ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्रेकनंतर झीरो अवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे...
महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनावरून वातावरण तापलेलं असताना.. दिल्लीच्या संसदेतही आज वादाची ठिणगी पडली.. निमित्त ठरलं राहुल गांधींचं एक वक्तव्य..
राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला.. यावेळी त्यांनी संविधान हातात पकडून बोलण्यास सुरूवात केली.. पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरूवात केली.. खोटे खटले चालवल्याचा आरोप केला.. ईडी चौकशीचाही उल्लेख केला.. इंडि आघाडीच्या नेत्यांना जेलमध्ये डांबलं.. पण अशावेळी सरकारशी लढण्याची हिंमत कशी आली? हे सांगताना.. राहुल गांधींनी भगवान शंकर, महावीर, गुरुनानक, येशू अशा विविध धर्माच्या देवांचे फोटो हातात घेतले.. हे सर्व 'डरो मत' असं सांगतात.. असं म्हंटलं..
आणि अशातच त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं... 'स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक दिवसरात्र हिंसा आणि द्वेष पसरवतात'.. आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद पेटला.. स्वत: पंतप्रधान मोदींनीही उभे राहून विरोध दर्शवला.. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब असल्याचे सांगितले... तर राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शाहांनी केली.. पाहूयात..