✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

abp majha web team  |  26 Jun 2026 11:17 PM (IST)
ABP News

होणार... होणार... होणार... असं जाहीर सांगत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं अखेर ऑपरेशन टायगर २.० नुकतंच यशस्वी केलं. ठाकरेंच्या शिवसेनेतल्या सहा लोकसभा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. उद्धव ठाकरे यांच्याशी संवादाचा अभाव, नेते आणि कार्यकर्त्यांची होणारी उपेक्षा, विकासनिधीचा अभाव आणि त्यामुळं मतदारसंघातली तुंबलेली विकासकामं अशी एक ना अनेक कारण देत या खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत उडी मारली. त्यामुळं लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या सातवरून तेरावर पोहोचलीय. याचा थेट फायदा एनडीएला झाला असून, लोकसभेत एनडीएच्या खासदारांचं संख्याबळ हे चांगलंच वाढलंय. त्यामुळं केंद्रीय राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला आधीच मिळणारा भाव आता आणखी वधारलाय.


या ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास आणखी वाढला असल्याचं स्पष्ट दिसून येतंय. त्यामुळं ऑपरेशन टायगर २.०च्या यशानंतर शिवसेनेनं आपलं लक्ष्य ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांवर केंद्रित केल्याची सूत्रांची माहिती आहे. २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसला. उद्धव ठाकरेंचे केवळ वीस आमदार त्या निवडणुकीत निवडून आले. पण निवडून आल्यानंतर पुढे काय? कारण भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीकडे विधानसभेत सध्या प्रचंड बहुमत आहे. त्यामुळं साहजिकच महायुतीच्या आमदारांच्या तुलनेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची मोठी अडचण झाली असल्याचं कानावर पडतंय. ना त्यांच्या मतदारसंघातली विकासकामं पुढे सरकतायत, ना पुरेसा विकासनिधी त्यांना मिळतोय. त्याच अस्वस्थतेतून ठाकरेंच्या चार आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदेंची नुकतीच भेट घेतल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चार आमदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेतल्या १२ आमदारांचा गट शिवसेनेत यायला तयार असल्याचा विश्वास शिंदेंना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गटाला पक्षांतराच्या दृष्टीनं नियमानुसार दोन तृतीयांश बहुमत म्हणजे आणखी किमान दोन आमदारांची गरज भासू शकते. त्यामुळं येत्या काळात आमदारांच्या आकड्यांची जुळवाजुळव करून शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन ३.० राबवण्यात येण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.