✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour PM Modi - Sharad Pawar : राज्यात कुस्ती, दिल्लीत दोस्ती; मोदी - पवारांच्या मनमोकळ्या गप्पा

विजय साळवी, एबीपी माझा   |  21 Feb 2025 11:35 PM (IST)

ब्रेकनंतर वेळ झाली नवी दिल्लीत जाण्याची.. आज देशाच्या राजधानीत सारस्वतांचा मेळा जमला होता.. आणि निमित्त होतं.. दिल्लीत सुरु होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच... 
आजपासून दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली.. आणि याच ऐतिहासिक सोहळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं.. नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये हा सोहळा पार पडला.. यावेळी देश-विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते..  विज्ञान भवनात संमेलनाचे उद्घाटन झालं आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर आहेत. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, उद्घाटक या नात्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. 


असं असलं तरी चर्चा झाली ती पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांची.. जेव्हा दीप प्रज्वलनाचा सोहळा पार पडत होता. तेव्हा प्रतंप्रधान मोदींनी शरद पवारांच्या हाताला धरुन पुढे बोलवलं.. इतकंच नाही तर दीप प्रज्वलन करत असताना त्यांनी पवाराचा हात धरुन ठेवला होता.. त्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दीप प्रज्वलनाची विनंती केली.. 


हा झाला एक भाग.. 


दुसरा भाग होता मंचावर.. पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांची खूर्ची अगदी शेजारी शेजारी होती.. दीपप्रज्वलन पार पडल्यावर सर्व मान्यवर
आपआपल्या खुर्च्यांकडे वळले.. जेव्हा मोदी-पवार आपआपल्या स्थानाजवळ पोहोचले.. तेव्हा मोदींनी पवारांसाठी खुर्ची मागे खेचत त्यांना आधी बसण्याची विनंती केली.. मोदींनी केलेला हाच सन्मान काही सेंकंदामध्ये सोशल मीडियात व्हायरलही झाला..


आता तिसरा प्रसंग.. 


जेव्हा शरद पवारांनी आपलं भाषण संपवलं.. आणि ते पुन्हा एकदा आपलं स्थानग्रहण करण्यासाठी पोहोचले.. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खुर्चीवरुन उठले.. त्यांनी पवारासाठी खुर्ची मागे खेचली.. मोदींनी अगदी हाताला धरुन शरद पवारांना खुर्चीवर बसवलं.. इतकंच नाही तर मोदींनी शरद पवारांसाठी पाण्याचा ग्लासही भरला.. आणि त्यांना पाणी घेण्याची विनंतीही केली... शरद पवारांनी मात्र, पाणी न पिता.. स्मित हास्यातूनच मोदींचे आभार मानले..


खरंतर, मंच, मराठी साहित्य संमेलनाचा होता.. पण, चर्चा झाली ती मोदी-पवारांमधील याच सगळ्या प्रसंगांची... आता त्याचे थेट राजकीय अर्थ जरी नसले.. तरी त्याचा महाराष्ट्राच्य़ा राजकारणावर कसा परिणाम होतो.. हे उद्या सकाळी साडे नऊ वाजताच कळेल.. 


दुसरीकडे मोदींनी आपलं अख्खं भाषण जवळपास मराठीतूनच केलं.. आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाचं कौतुक करत, मराठी भाषा किती संपन्न होती.. याचेही अनेक उदाहरणं मोदींनी दिली.. पाहुयात त्यातलंच एक महत्वाचं वक्तव्य...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour PM Modi - Sharad Pawar : राज्यात कुस्ती, दिल्लीत दोस्ती; मोदी - पवारांच्या मनमोकळ्या गप्पा

TRENDING VIDEOS

Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report1 Hour ago

Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report2 Hour ago

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?11 Hour ago

Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report12 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.