Zero Hour : ब्रिक्सची परिषदेत भेट, पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंडळी तुम्ही पाहताय झीरो अवर... महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक घडामोडी आपण पाहिल्यात.. पण आज जगातिक पातळीवरही एक मोठी घडामोड घडली.. जी पाहणं महत्वाचं ठरतं.. आज रशियातील कझानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. रशियात होणाऱ्या ब्रिक्सची परिषदेत ही भेट झाली. त्या पार्श्वभूमीवर मोदी आणि पुतिन यांच्यात चर्चा झाली. रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता नादायला हवी, आणि त्यासाठी लागेल ती मदत करण्यास भारत तयार आहे, असं मोदी म्हणाले. कझानमध्ये भारतानं दूतावास उघडण्याचा निर्णय देखील जाहीर केला.(( यावरून पुतिन यांनी भारत आणि मोदींचं तोंड भरून कौतुक केलं. भारताच्या धोरणांमुळे भारत-रशिया नात्याला खूप फायदा होईल, कझानमध्ये तुम्ही आलात याचा मला खूप आनंद झाला असं पुतिन म्हणाले. .. )) याच भेटीचा आंतरराष्ट्रीयस्तरावर काय काय परिणाम होवू शकतो सांगतायेत अंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर... बघुयात