Zero Hour : PCMC Corporation : महापालिकेचे महामुद्दे : पे अँड पार्क जनतेसाठी की कंत्राटदारासाठी?
आपल्याकडल्या सरकारी यंत्रणांचे काही निर्णय असे असतात की ते जनतेसाठी घेतलेत की कंत्राटदारांसाठी, असा प्रश्न पडतो. बातमी पिंपरी चिंचवडमधून आहे. तिथल्या महापालिकेनं पे अँड पार्कसाठी काही ठिकाणं नव्यानं निश्चित केली आहेत. मात्र या निर्णयाला पक्षपातीपणा आणि कंत्राटदार धार्जिणेपणाचा वास येतोय.. आम्ही असं का म्हणतोय, ते जाणून घेण्यासाठी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
दुचाकी आणि रिक्षासाठी ताशी ५ रुपये, चारचाकीसाठी १० रुपये, टेम्पोसाठी १५ रुपये, मिनीबससाठी २५ तर ट्रकसाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत.
तुम्हाला वाटेल यातले ७० ते ८० टक्के पैसे पालिकेला मिळतील, आणि उरलेले ठेकेदाराला. पण तसं नाहीये.
आणि म्हणूनच पिंपरी चिंचवडकरांनी या नव्या पार्किंग योजनेला तीव्र विरोध केला आहे.
महापालिकेनं मात्र यामागे अजबच तर्क सांगितलाय. पार्किंगचे पैसे वसूल करण्यासाठी जे अॅप बनवण्यात आलंय, त्या स्टार्टअपला आपल्या गुंतवणुकीचा खर्च तरी काढता यावा, म्हणून त्यांना ७५ टक्के रक्कम दिली जाणार आहे