Zero Hour : Parbhani Corporation : महापालिकेचे महामुद्दे : वाहतूक कोंडी,पार्किंग ते धुळीचं साम्राज्य

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातल्या महानगरांमध्ये हमखास दिसणारी वाहतूक कोंडीची समस्या आता छोट्या शहरांमध्येही जाणवू लागलीय. परभणीत महापालिका आणि शहर वाहतूक शाखेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सध्या शहरातल्या नागरिकांना बसतोय. बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, पार्किंगची नसलेली व्यवस्था, वेड्यावाकडी उभी करण्यात आलेली वाहनं आणि रस्ता अडवून उभे राहणारे फेरीवाले यांच्यामुळं परभणी शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. या शहरात नेमकी परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेऊयात महापालिकेचे महामुद्देमधल्या खास रिपोर्टमधून.
परभणी...मराठवाड्यातलं एक जुन अन चळवळीचं शहर... शहराची लोकसंख्या आज ४ लाखांच्यावर गेलीय शहर विस्तीर्ण झालंय..मात्र जेवढं शहर विस्तीर्ण होतंय तेवढीच इथे वाहतूक कोंडी होतीय...ठिकठिकाणी वाढलेलं अतिक्रमण,अरुंद रस्ते,अनेक वर्षांपासून बंद पडलेले सिग्नल,जागोजागी लावलेल्या दुचाकी,चारचाकी,मध्येच उभे असलेले फेरीवाले,ऑटो चालकांचा रास्ता रोको नित्याचाच सम विषय पार्किंग नावाचा नसलेला भाग एक ना अनेक समस्यांमुळे शहरात वाहन चालवणे तर सोडाच माणसाला चालताही येत नाही याचे ना महानगरपालिकेला सोयरसुतक ना वाहतूक पोलिसांना त्यामुळे शहराचाच श्वास गुदमरलाय अशी अवस्था परभणी शहराची झालीय..