✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : भारताकडून पाकवर अभूतपूर्व हल्ला 25 मिनिटांत 24 'प्रीसीजन मिसाईल हल्ले'

abp majha web team   |  07 May 2025 11:41 PM (IST)

नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा गुन्हेगार दहशतवादी मसूद अझहरचंही (Masood Azhar) कंबरडं मोडलं. मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 जणांचा खात्मा केला. निष्पापांचा बळी घेणाऱ्या मसूदच्या कुटुंबावरच हिशेब देण्याची वेळ आल्यानं अझहर हादरून गेला.


पाकिस्तानातल्या बहवालपूरमधील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय (Jaish-e-Mohammed). दहशतवाद्यांचा अड्डा, ट्रेनिंग कॅम्प आणि मदरसा असलेल्या या मुख्यालयाची आता अशी अवस्था झाली आहे. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये मरकज सुबहान अल्ला नावानं ओळखलं जाणारं जैशचं हे मुख्यालय उद्ध्वस्त झालं. भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूर अझरचा हा गड होता. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं त्याचीच निवड का केली, याचं उत्तर सैन्यानं दिलं.


मसूद अझहरचे मुख्यालय उद्ध्वस्त


मरकज सुबहान अल्लावर हल्ला करून दहशतवादी मसूर अझरचं कंबरडंच भारतीय सैन्यानं मोडलं आहे. या हल्ल्यात मसूद अझहर बचावला. पण त्याच्या कुटुंबातल्या 10 जणांचा आणि 4 जवळच्या सहकाऱ्यांचा खात्मा झाला. हल्ल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला. तर रौफचा मुलगा हुजैफा आणि रौफची सून आणि मसूदच्या बहिणीचा मृत्यू झाला. रौफ असगर हा भारतातील मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. 


हल्ल्यात संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाल्यानं शेकडो जणांचा बळी घेणारा मसूद अझहर हादरून गेला. 'भारताच्या हल्ल्यात मीही मेलो असतो तर बरं झालं असतं, भारत आता कुणाची दया करणार नाही' अशी त्याची प्रतिक्रिया आहे. 


रक्तरंजित खेळ अझहरवर उलटला


भारतात शेकडो निष्पापांचे बळी घेणारा दहशतवादी आता रडकुंडीला आला. त्यानं केलेला रक्तरंजित खेळ आता त्याच्यावरच उलटल्यानं त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मरकज सुबहान अल्लावरचा हल्ला भारतीय सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष आहे. कारण भारताच्या सीमेपासून मसूदचं मुख्यालय बहावलपूर तब्बल 100 किलोमीटर आत आहे. बहवालपूर लाहोरपासून 400 किलोमीटर अंतरावर आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : भारताकडून पाकवर अभूतपूर्व हल्ला 25 मिनिटांत 24 'प्रीसीजन मिसाईल हल्ले'

TRENDING VIDEOS

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?1 Hour ago

Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल3 Hour ago

Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही4 Hour ago

Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती5 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.