Zero Hour on Pune Porsche Car Accident : विशाल अगरवालच्या जामिनाचा मार्ग मोकळा?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील ड्रंक आणि रॅश ड्रायव्हिंग अपघाताला आठवडा उलटला.. ज्याच्यामुळे हे सर्व घडलं त्याच्या वडिलांना कोठडी झाली.. आजोबांची, मित्रांची, ड्रायव्हरची चौकशी झाली.. अल्पवयीनची बाल सुधारगृहात रवानगी झाली.. ज्या बारमध्ये दारु प्यायली त्या दोन बारना टाळं लागलं.. केवळ त्या बारलाच नाही तर पुण्यातील इतर ३२ पब-हॉटेल्सना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईची धडक बसली.. १० रुफटॉप, अंदाजे १६ पब, इतर ६ परवानाकक्ष बार सील केले.. ५४ हॉटेल वर गुन्हे नोंद करत, ५ लाखांचा दंडही वसूल केला..
आणि या कारवाईमुळेच आज पुण्यात आंदोलन देखील झालं.. ज्या बारमध्ये अल्पवयीनला दारू देण्यात आली.. त्यावर कारवाई करा.. पण नियम पाळणाऱ्यांवर, लायसन्स असणाऱ्यांवर कारवाई का? असा सवाल कारवाईमुळे त्रस्त पब-बार मालक विचारतायत.. ही कारवाई म्हणजे 'गव्हासोबत खडेही भरडले जातात' अशीच असल्याची टीका त्यांच्याकडून होतेय.. या कारवाईनंतर आज पब आणि बार मालकांची बैठक झाली.. तसंच राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्रही देण्यात आलं..
एकिकडे हॉटेल, बारवर महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क कारवाई करत असताना... दुसरीकडे पुणे पोलिसांकडूनही अपघात प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू आहे.. अपघातग्रस्त पोर्शा गाडीचा त्या दिवशीच्या प्रवासाचं संपूर्ण सीसीटीव्ही पोलिसांनी तपासलं.. तसंच येरवडा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या, त्या गाडीची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणीदेखील पूर्ण झाली.. याशिवाय अपघात झाला त्यावेळी शेजारी सीटवर बसलेला ड्रायव्हर, गंगाराम पुजारी याचे कॉल डिटेल्स रेकॉर्डही पोलीस तपासणार आहेत.. कालच त्याची गुन्हे शाखेने चौकशी केली होती.. त्या चौकशीत अपघाताच्या दिवशी, पोर्शा गाडी अल्पवयीन मुलगाच चालवत होता..
अपघात झाला तेव्हा ड्रायव्हिंग व्हील अल्पवयीनाच्या हाती होतं.. अशी माहिती ड्रायव्हर गंगारामने दिली.. तसंच अपघाताच्या दिवशी तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना न देणे.. असा ठपका ठेवत... थोड्याच वेळापूर्वी येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशा २ कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय... ही केस कुठल्याही अँगलने कमजोर राहू नये, त्यात लूपहोल सापडू नये.. ज्याचा फायदा आरोपीला मिळेल.. ते सर्व मार्ग बंद करून, मजबूत पुरावे गोळा करत असल्याची माहिती... पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली.. तसंच तपासादरम्यान पोलिसांवर कोणताही दबाव नसल्याचंदेखील त्यांनी स्पष्ट केलं..