Zero Hour : अजित पवारच राष्ट्रवादीचे 'दादा', झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 15 Feb 2024 11:30 PM (IST)
Zero Hour : अजित पवारच राष्ट्रवादीचे 'दादा', झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह ९ आमदारांविरोधात निलंबनाची याचिका दिली. तर अजित पवारांनी सगळा पक्षच आपल्यासोबत असल्याचं सांगत पक्षावर दावा केला. शरद पवारांचा अधिकार आणि त्यांनी केलेल्या नेमणुकांवर प्रश्नचिन्ह उभा केलं. खरी राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न घेऊन शिवसेनेप्रमाणेच प्रकरण सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर पोहोचलं. गेली सहा महिने यावर सगळीकडे खल सुरु होता. दरम्यान ६ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने आमदारांच्या संख्येच्या आधारे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल केलं. आणि अजित दादांनी एक महत्वाची फेरी जिंकली.