✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

abp majha web team  |  02 Jul 2026 10:23 PM (IST)
ABP News

मुंबई... मायानगरी.. स्वप्ननगरी... कधीही न झोपणारं शहर.. वगैरे वगैरे.. ही सगळी ओळख.. आपण यापूर्वी अनेकदा पाहिलीय.. ऐकलीय.. या शहराच्या अनेक गोष्टीही ऐकल्यात..
पण, मुंबईची आणखी एक ओळख आहे.. आणि ती गेल्या तीन दिवसांमध्ये वारंवार समोर आली.. ही ओळख म्हणजे.. हादसों का शहर ..
1956 साली सीआयडी... सिनेमात एक गाणं होतं.. त्याचे बोल होते.. ऐ दिल है मुश्किल जीना यहां, जरा हट के, जरा बच के ये है मुंबई मेरी जान...

सत्तर वर्षांपूर्वीच्या गाण्यातून मुंबईच्या वाढत्या शहरीकरणावर भाष्य करण्यात आलं होतं... तेव्हापासून आजपर्यंत.. साल बदललं..शहर बदललं.. उंचच उंच इमारतींनी शहर भरुन गेलं..पण, शहर फोफावत असताना नागरी व्यवस्थांकडे मात्र दुर्लक्ष होतंय का? हा प्रश्न गेल्या सत्तर वर्षांपासून कायम आहे..
आजही हाच प्रश्न विचारला जातोय..आणि त्याला निमित्त ठरलीय.. मुंबईतील साकी नाका परिसरातील घटना...

नमस्कार मी अमोल जोशी.. तुम्ही पाहाताय झीरो अवर..

गेल्या दोन दिवसांपासून मुंईत सर्वदूर जोरदार पाऊस पडतोय.. त्यामुळे मुंबईकर चांगलेच सुखावलेत.. बरं, फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्राच्या इतर भागातही पावसानं जोर धरलाय.. त्यामुळे राज्यात थोडं समाधानाचं वातावरण आहे.. पण, मुंबईत चित्र जरा वेगळं आहे.. त्याचं कारण म्हणजे नुकत्याच घडलेल्या दोन दुर्घटना..
परवा मुंबईतील चेंबूरमध्ये एका स्कूल व्हॅनवर झाड कोसळलं.. त्यात एका अकरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.. या दुर्घटनेच्या ४८ तासांच्या आतच आज साकी नाका परिसरात एक दुर्घटना घडली..

साकीनाक्यातील खैरानी रोडवर एका मॅनहोलचं काम सुरु होतं.. त्यामुळे त्यावरचं झाकण काढलं होतं.. पण, मॅनहोल उघडं केल्यानंतर त्याच्या आसपास सुरक्षेचे बॅरिकेड्स लावणं अपेक्षित होतं.. ते काही केलेलं नव्हतं.. त्यात सकाळी त्या भागात चांगला पाऊसही झाला होता.. नेमकं सव्वा अकराच्या सुमारास ५५ वर्षांचे अस्लम शेख अन्सारी भरपावसात मोबाइलवर बोलत चाललेले होते.. आणि ते या उघड्या मॅनहोलमध्ये पडले.. . तिथं असलेल्या दोन तरुणांनी त्यांना वाचण्याचा प्रयत्न केला.. पण, काहीही फायदा झाला नाही..
बरं, या गटाराची खोली साधारण 25 फूट असल्यानं अग्निशमन दलाच्या मदतीशिवाय बचावकार्य शक्य नव्हतं..
अग्निशमन दलाचं पथक पोहोचेपर्यंत अस्लम अन्सरी मॅनहोलमध्ये दिसेनासे झाले.. बचावपथकं पोहोचली..
बचावकार्य सुरु झालं.. सुरुवातीला त्यांची छत्री आणि चप्पल सापडली.. पण, व्यक्ती काही सापडतं नव्हती.. त्यामुळे पाण्याचा वेग आणि प्रवाह.. दोन्ही गोष्टींचा अंदाज घेतला.. आणि पुढच्या मॅनहोलमध्ये तपास सुरु केला.. तर २० मिटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमधून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला..

व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळं मुंबई आणखी एक जीव गेला. मुंबईसह राज्यातील उघड्या मॅनहोल्सवरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले.. आणि पावसापेक्षा जोरदार राजकारणाला सुरुवात झाली..
हे सगळं आपण पाहणार आहोतच.. मात्र, सुरुवात आजच्या प्रश्नानं.. आणि त्यासाठी जावूयात मीडिया सेंटरला.

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.