✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour On INDIA Alliance: विरोधकांच्या 'इंडिया'चा बॉस बदलणार?काँग्रेसच्या तख्तावर बंगालचं आव्हान?

विजय साळवी, एबीपी माझा   |  10 Dec 2024 11:39 PM (IST)

मंडळी मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की आज देशात विरोधी पक्षनेता कोण आहे.. तर तुमच्यापैकी अनेक जण राहुल गांधींचं नाव घेतील.. काही जण शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, एम. के. स्टॅलिन... यांची नावं घेतील...

पण, सत्तेत कोण आहे.. असा प्रश्न विचारला तर तुमच्यापैकी प्रत्येक जण ठामपणे सांगेल की देशात मोदींची सत्ता आहे... आणि गेल्या दहा वर्षांपासून मोदींचा विजयी करिष्मा कायम आहे...

आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आज का सांगतोय.. तर त्याचं उत्तर आहे.. इंडिया... मंडळी.. इंडिया म्हणजे आपला देश नाही... तर हे इंडिया म्हणजे मोदी विरोधकांची आघाडी...

जुलै २०२३... देशात लोकसभेच्या निवडणुका वर्षभरावर आल्या होत्या.. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयी रथ रोखण्यासाठी... मोदींची हॅटट्रिक रोखण्यासाठी.. विरोधकांनी एकत्र येऊन... एक आघाडी स्थापन केली.. नाव ठेवलं.. Indian National Developmental Inclusive Alliance...
शॉर्ट फॉर्म होतो इंडी, पण त्याच आघाडीला इंडिया असं म्हणू लागले..

इंडिया आघाडीत अगदी पहिल्या दिवसापासून विचारसरणी आणि महत्वाकांक्षांचा संघर्ष होता.. आणि त्याचाच पहिला फटका बसला बिहारमध्ये.. ज्या नितीश कुमारांनी पुढाकार घेत आघाडीची पायाभरणी केली होती.. त्यांच्या पाटण्यातच विरोधकांची पहिली बैठकही झाली.. आणि तेच नितीश कुमार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले..

नितीश कुमारांच्या या निर्णयाला सर्वात मोठं कारण ठरलं.. ते म्हणजे विरोधकांच्या या इंडिया आघाडीचं मुख्य नेतेपद...

जानेवारी २०२४ ला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेतेपदाची जबाबदारी आली.. अर्थात काँग्रेस मोठा पक्ष असल्यानं... छोट्या मित्रपक्षांनी निर्णयाला विरोध केला नाही..

पण, महाराष्ट्र आणि हरिणायातील काँग्रेसचं पानिपत झालं.. आणि मित्रपक्षांमधून आता एक मागणी दबक्या आवाजात सुरु झाली आहे.. त्यात दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.. तिकडे काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी सभागृहाबाहेर अदानींसह अनेक मुद्द्यांवरुन आंदोलनं सुरु केली.
.
आणि इकडे राष्ट्रीय जनता दलाच्या लालूप्रसाद प्रसाद यादवांनी एक मोठं वक्तव्य केलं.. त्यांच्या वक्तव्याचे परिणाम थेट इंडिया आघाडीच्या भविष्यावर होऊ शकतात.. लालूप्रसाद यादव नेमकं काय म्हणाले आहेत, ते आधी पाहुयात.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour On INDIA Alliance: विरोधकांच्या 'इंडिया'चा बॉस बदलणार?काँग्रेसच्या तख्तावर बंगालचं आव्हान?

TRENDING VIDEOS

BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप4 Hour ago

Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म7 Hour ago

Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?7 Hour ago

Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल8 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.