✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठी

विजय साळवी, एबीपी माझा   |  01 Oct 2024 11:27 PM (IST)

अब की बार महायुती सरकार... अगली बार भाजपा सरकार...
ही घोषणा आहे... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची...
आणि त्यांनी ही घोषणा कुठे दिलीय... तर ते ठिकाण आहे... मुंबई...
निमित्त होतं.. ते भाजपचा पदाधिकारी मेळावा.. 
गेल्या सहा दिवसांत अमित शाहा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.. आहे ते आहेत मुंबईत... त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अमित शाह यांचा हा अतिमहत्त्वाचा दौरा यासह दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचं विश्लेषण आपण करणार आहोत... नमस्कार मी विजय साळवी... झीरो अवरच्या आजच्या नव्या कोऱ्या भागात आपलं स्वागत... 


आज महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहिली... किंवा त्यांची चर्चा करायचं म्हटलं... तर ती अनेक पातळ्यांवर बदललेली दिसतेय.... मराठवाड्यात वाढलेला मराठा विरुद्ध कुणबी संघर्ष हा त्यातलाच एक भाग.. मराठा नेते मनोज जरांगेंच्या राज्यव्यापी आरक्षण लढ्याचा फक्त सामाजिकच नाही तर राजकीय परिणामही झालाय.. आणि त्याचा सत्ताधाऱ्यांना कसा राजकीय फटका बसलाय हे आपण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात पाहिलं.. 


लोकसभा निवडणूक होऊन आता शंभर दिवस झालेत. आणि राज्यातल्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्यात. पण तरीही राज्यातल्या महायुती सरकारला या संघर्षावर औषध सापडलेलं नाही. 


मग, असं असतानाच जातीय गणितांवर धार्मिक तोडगा काढण्याचा प्रयत्न तर महायुती सरकार करत नाहीय ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.. खरं तर, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली असं म्हणत एकनाथ शिदेंनी बंडखोरी केली होती. तेव्हापासून आजपर्यंत महायुती सरकारनं कायम आक्रमक हिंदुत्वाचाच पुरस्कार केला. पण, गेल्या काही दिवसांमध्ये त्या गोष्टींमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं दिसून येतंय.. शिंदे-फडणवीसांच्या मठ-महंतांना भेटीगाठी वाढल्यायत.. 


आता गेल्या ४८ तासांमधले कार्यक्रम पाहा... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा भाईंदरमध्ये भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलन कार्यक्रमात पोहोचले.. तिथं त्यांनी स्वामी विद्याभास्करजी, ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी शंकराचार्य सदानंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले.. इतकंच नाही तर या सगळ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं..
नेमके त्याच वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात  कण्हेरी मठातील संत सोहळ्यात पोहोचले.. तिथं त्यांनी लव्ह जिहाद, व्होट जिहादपासून शरद पवारांपर्यंत अशा सगळ्या मुद्द्यांवरुन भाष्य केलं.. 


आता आजचा दिवस बघा.. सकाळी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी  पाद्यपूजन सोहळा पार पडला.. उत्तराखंडमधील बद्रिकाश्रम ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या हस्ते हे पूजन झालं.. त्यानंतर मुख्यमंत्री व्हाया सांगली कोल्हापुरातल्या कण्हेरी मठामधल्या संत सोहळ्यात पोहोचले... 


खरं तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. दोघांच्याही या भेटीगाठींमधून हिंदू मतांचं एकत्रीकरण साधण्याचा प्रयत्न होतोय.. आणि त्यावरच आहे आपला आजचा पहिला प्रश्न... तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठी

TRENDING VIDEOS

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग12 Hour ago

Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची12 Hour ago

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज17 Hour ago

Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात19 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.