Zero Hour Devendra Fadnavis Office:फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड, राज्यातील सुरक्षेवर प्रश्वचिन्ह?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनमस्कार मी विजय साळवी... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत...
मंडळी कुणी जर विचारलं की महाराष्ट्रात सर्वात महत्वाची इमारत कोणती...? तर कोणीही सांगेल की मंत्रालय...
कारण, इथूनच आपल्या राज्याच्या... महाराष्ट्राच्या कामकाजाचा गाडा हाकला जातो.. त्यातही सर्वात महत्वाचा मजला कोणता... तर उत्तर सहावा मजला... जिथं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची केबिन्स आहे..
आता तुम्ही म्हणाल की मंत्रालयाचा हा भूगोल... आम्ही आता का सांगतोय.. तर उत्तर आहे...
एक महिला..
त्यांचं नाव धनश्री सहस्रबुद्धे..
याच धनश्री काल संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास मंत्रालयात पोहोचल्या..
आता इथं आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे धनश्री सहस्रबुद्धे पावणेसातच्या सुमारास मंत्रालयात गेल्या कशा?
कारण सर्वसामान्यांना मंत्रालयात जाण्यासाठीचा मिळणारा पास हा फक्त संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतचाच मिळतो..
तुमच्यापैकी कधी कोणी मंत्रालयात आलं असेल किंवा बातम्या पाहिल्या असतील... तर
तुम्हालाही याची कल्पना असावी.
आता पुढची गोष्ट ऐका..
जेव्हा याच धनश्री सहस्रबुद्धे मंत्रालयात पोहोचल्या.. त्याही पास न काढता..
इतकंच नाही तर त्या मंत्रालयात शिरल्या.. आणि त्यांनी थेट सहावा मजला गाठला... तिथून त्या पोहोचल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनासमोर... तिथं त्यांनी आरड़ाओरडा करायला सुरुवात केली.. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली नेमप्लेट तोडली.. दालनातील कुंड्यांचीही नासधूस केली...
इतका सगळा प्रकार घडला.. महिलेच्या घरी पोलीसही पोहोचले.. चौकशी सुरु केली... आणि पुढे आलं मुळ कारण... धनश्री सहस्रबुद्धेंची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती समोर आली... त्यानंतर त्यांचं समुपदेशनही करण्यात येतंय... धनश्री सहस्रबुद्धे यांनी याआधीही भाजप कार्यालयात गोंधळ घातला होता.. तसंच राहत्या सोसायटीमध्येही त्यांनी अनेकांशी भांडणं केल्याच्या तक्रारी आहेत.. इतकंच नाही तर मॅजिस्ट्रेट कोर्टानं धनश्री सहस्रबुद्धे यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचे आदेशही दिले होते.. तरीही या धनश्री विनापास मंत्रालयात शिरल्या कशा..? याचाच तपास पोलीस करतील.. पण, घटनेनं जो प्रश्न उपस्थित केलाय.. तोच प्रश्न आम्हीही आज महाराष्ट्राला विचारलाय... तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला..