✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour on Amit Shah Nagpur : शाह नागपुरात, गडकरी काश्मिरात; गैरहजेरीचा अर्थ काय?

विजय साळवी, एबीपी माझा   |  24 Sep 2024 10:51 PM (IST)

झीरो अवरची सुरुवात करुयात राजकीय पटलावर घडलेल्या एका महत्वाच्या बातमीनं.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील प्रमुख पक्षांनी किती जोरदार तयारी केलीय, हे आपल्याला रोज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमधून आणि राजकीय यात्रांमधून लक्षात येतं. 
त्याच राजकीय कार्यक्रमांमध्ये आज सर्वात जास्त चर्चेत होता तो भाजपचा कार्यकर्ता मेळावा. आणि त्यात झालेलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं मार्गदर्शन. 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपुरात पोहोचले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत विदर्भ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा पार पडला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अमित शाहांनी या मेळाव्यात कानमंत्र दिला. तोच कानमंत्र आपण पाहणार आहोतच. पण त्या मेळाव्यातील इनसाईड स्टोरीही ऐकणार आहोत. पण आजच्या मेळाव्यात एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत आली ती म्हणजे नागपुरात भाजपच्या मंचावरची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अनुपस्थिती. 
अमित शाह नागपुरात पोहोचले. तेव्हा त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तिथं होते.. मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार आणि भाजपच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवेही होते.  
पण मंचावर नव्हते ते नागपूरचे खासदार, भाजपचे माजी अध्यक्ष आणि केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या इतक्या महत्वाच्या दौऱ्यावर आलेत.. नेमके त्याचवेळी नितीन गडकरी हे नागपूरपासून एक हजार ८०० किलोमीटर दूर जम्मू काश्मीरात होते.. बरं, ते काही फॅमिली व्हॅकेशनसाठी तिथं गेलेले नाहीत. तर जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या नियोजित प्रचारासाठी गडकरी तिथं गेलेत... 
पण आता अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा... आणि नितीन गडकरींचा काश्मीर दौरा.. या दोन्हीच्या तारखा एकच. 
हा निव्वळ योगायोग म्हणावा... की आणखी काय... प्रश्न तर आहे.. आणि त्यानिमित्तानं आज दिवसभरात रंगलेल्या चर्चांवरच आहे आपला पहिला प्रश्न. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour on Amit Shah Nagpur : शाह नागपुरात, गडकरी काश्मिरात; गैरहजेरीचा अर्थ काय?

TRENDING VIDEOS

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ11 Hour ago

Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?11 Hour ago

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार12 Hour ago

Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप12 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.