✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Nilesh Lanke Sushma Andhare:शिंदेंचा सन्मान,ठाकरेंचा संताप;राऊतांचं वक्तव्यावरुन टीकास्त्र

विजय साळवी, एबीपी माझा   |  12 Feb 2025 11:26 PM (IST)

नमस्कार मी विजय साळवी... तुम्ही पाहताय एबीपी माझा... आणि एबीपी माझावर सुरु आहे... झीरो अवर...

मंडळी, तुम्ही एक वेळ हवामानांचा अचूक अंदाज लावता येऊ शकतो... एक वेळ उशिरानं धावणाऱ्या लोकल ट्रेनची वेळ सांगता येऊ शकते..

एखाद्या संघाच्या हातातून निसटत असलेला सामना कसा जिंकता येईल.. याचा नेमका अंदाज बांधता येऊ शकतो..

पण महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल... याचा अंदाज भल्या भल्या राजकीय पंडितांनाही शक्य होणार नाही.. आणि मी हे का सांगतोय ते समजून घेण्यासाठी.. आवश्यकता आहे फक्त चोवीस तास मागे जाण्याची

ठिकाण होतं... नवी दिल्ली...
निमित्त होतं... पुण्याच्या सरहद संस्थेचा महादजी शिंदे पुरस्कार प्रदान सोहळा...
पुरस्काराचे मानकरी होते... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे..
आणि पुरस्कार ज्यांच्या हस्ते देण्यात आला.. त्यांचं नाव होतं... शरद पवार...
या सोहळ्याला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही उपस्थिती होती...

हा इतका मोठा राजकीय योग होता.. की त्याचे परिणाम आजही दिसले.. फार सस्पेन्स न राखता... एकदम सोेप्या शब्दात सांगतो...

काल रात्री झालेल्या त्या पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतुक केलं.. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली असं म्हणत असताना शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दुखावलं...

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दुखावलं हा काही आम्ही लावलेला अंदाज नाही... तर त्याचा पुरावा अवघ्या १२ तासांनंतर म्हणजे आज सकाळी साडे नऊ वाजता.. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या बोलण्यातून आला... ((राऊत नेहमीप्रमाणे माध्यमांसमोर आले.. ते काय बोलणार याकडे आधीच लक्ष लागलं होतं.. कारण, पवारांनी एकनाथ शिंदेंचं केलेल्या कौतुकाची पार्श्वभूमी आजच्या पत्रकार परिषदेला होती.. ))
आपल्या दैनिक पत्रकार परिषदेत अगदी पहिल्या शब्दापासून राऊतांनी कालच्या सोहळ्यावर बरसायला सुरुवात केली.. कोणालाही वाटलं नव्हतं.. की ते आरोप करता करता... शरद पवारांवरही टीका करतील... राऊतांचं मुख्य टार्गेट शिंदेंच होते.. पण, शिंदेंच्या आडून त्यांनी शरद पवारांचं नाव घेऊन... टीका केली.. आणि तीव्र नाराजीही दर्शवली..

खरं पाहिलं तर गेल्या महिन्याभरातच उद्धव ठाकरेंनी अनेकवेळा स्वबळाचे संकेत दिले आहेत.. इतकंच नाही तर त्यांनी जाहीर सभेतूनही यासंदर्भातील मोठं वक्तव्य केलं होतं.. पण, असं असलं तरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना पक्षानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत मात्र, नीट अंडरस्टॅडिंग ठेवलं होतं.

आता हेच पाहा... राऊतांनी शरद पवारांना मार्गदर्शक मानलं होतं.. तेच राऊत आज पवारांना उद्देशून बोलले... मग, काय.. भाजप शिंदेची शिवसेना... यांनी राऊतांना यथेच्छ झोडून काढलं...

कोणकोणत्या विशेष वक्तव्यांनी आजचा दिवस गाजला... पाहूयात त्याचाच सुपरफास्ट आढावा...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Nilesh Lanke Sushma Andhare:शिंदेंचा सन्मान,ठाकरेंचा संताप;राऊतांचं वक्तव्यावरुन टीकास्त्र

TRENDING VIDEOS

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात10 Hour ago

T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं13 Hour ago

Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले13 Hour ago

Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना15 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.