Zero Hour : लोकसभेच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज निवडणुका झाल्या तर कोण सत्तेत येईल?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभेचा निकाल लागला आणि.. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग आला.. कारण, राज्यात अवघ्या चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणारय.. आणि त्याआधीच सर्वपक्ष कामाला लागलेत.. आपआपल्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांचे मेळावे सुरु केलेत.. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनं आज वर्धापन दिनही साजरे केले.. कार्यकर्त्यांना विधानसभेच्या दृष्टीनं मोठा-मोठ्या घोषणाही केल्यात.. तर उद्धव ठाकरेंनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुखांची बैठक घेतली.. महाराष्ट्र भाजपनंही पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला.. इतकंच नाही तर शिंदेंच्या सेनेचीही बैठक आजच पार पडतेय..
आता प्रत्येक पक्षाचं टार्गेट एकच.. ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा.. इथंही लोकसभेप्रमाणेच सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामाना होण्याची शक्यता आहे.. आज तरी अशाच लढतीचं चित्र आहे..
लोकसभेचा विचार केला तर महाविकास आघाडीनं राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागा जिंकल्यात.. त्यामुळे याच विजयाच्या विश्वासावर विधानसभेतही आम्हीच बाजी मारणार.. असा विश्वास मविआच्या नेत्यांनी व्यक्त केलाय.. तर मतांची टक्केवारी आपल्याच बाजूनं आहे.. असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच विधानसभेच सत्तेत येणार.. असा विश्वास व्यक्त केलाय.. पाहुयात.
लोकसभेतील निकालांचा आगामी विधानसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल याची चर्चा आपण ब्रेकच्या आधी करत होतो... याच विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहुयात.. पोल सेंटरवर...