Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनमस्कार मी, विजय साळवी.. तुम्ही पाहाताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झीरो अवर...
मंडळी.... महाराष्ट्रातल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या सरकारमधल्या खातेवाटपाचा कार्यक्रम कधी होणार.... याचाच निकाल दिल्लीत लागू शकतो.. कारण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत डेरेदाखल झालेत.. पण या दिल्लीभेटीत माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यालोबत नाहीत. ते मुंबईमुक्कामी थांबलेत.. त्यामुळं साहजिकच राजकीय चर्चांना उधाण तर येणारच...
नव्या महायुती सरकारचा शपथविधी होऊन आता सहा दिवस झालेत.. अर्थात त्या सोहळ्यात फक्त एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय... कोणतंही खातेवाटप झालेलं नाहीय.. म्हणून विरोधक.. हे दिवसरात्र... खातेवाटपावरुन... महायुती सरकारला टार्गेट करतायत.. त्यातच आज दुपारी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस.. आणि संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार... दिल्लीत पोहोचले..
दुपारी एकनाथ शिंदेंही दिल्लीला जाणार अशा बातम्याही आल्या.. पण, त्यांनी मुंबईतच राहणं पसंत केलं.. आता दिल्लीत काय काय झालं.. हे आपण आजच्या झीरो अवरमध्ये पाहणार आहोतच..
पण, त्यासोबतच आपण महाविकास आघाडीत नेमकं काय काय सुरु आहे.. याचाही आढावा घेणार आहोत..
मंडळी, तुम्हाला आठवतंय का? विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.. तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती.. त्याच बैठकीत काही पराभूत उमेदवारांनी स्बवळावर लढावं अशी मागणी केल्याची बातमी होती.. इतकंच नाही तर जेव्हा ठाकरेंनी महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठीची बैठक आयोजित केली.. तिथंही काही नेत्यांचा सूर हा स्बवळाचाच होता..
बरं, हे सारं जरी असलं तरी महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून ठाकरेंची शिवसेना काम करत राहणार.. आणि निवडणुकाही लढणार... अशीच माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे...
पण, मंडळी हे सगळं घडलं पंधरा दिवसांपूर्वी.. आणि हे सगळं मी आज का सांगतोय.. कारण त्याला पार्श्वभूमी आहे.. दिल्लीची... राष्ट्रीय राजकारणातल्या इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलून ते ममता बॅनर्जींना द्यावं म्हणत शरद पवार, लालू प्रसाद यादवांपासून ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत अनेकांनी काँग्रेससमोर आव्हान उभं केलंय.. इतकंच नाही तर इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षानंही पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिलाय.. इतकंच नाही तर तिथं काँग्रेसनं उमेदवार दिले तरी त्यांच्याविरोधात लढण्याची तयारीही केलीय..
त्यामुळं जे पंजाबमध्ये झालं.. जे पश्चिम बंगालमध्ये झालं... तेच आता दिल्लीतही होईल का.. आणि या घटनेचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का? आणि झाला तर केजरीवालांच्या आम आदमी पक्षाचा पॅटर्न... उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात राबवणार का?
मंडळी, मविआतील याच संघर्षावर आहे आपला आजचा पहिला प्रश्न.. आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला..