Zero Hour : आंबेडकर - मविआ नेत्यांचं फिस्कटलं ? प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : आंबेडकर - मविआ नेत्यांचं फिस्कटलं ? प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार ? लोकसभेचा रणसंग्राम सुरु झालाय.. १९ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर अशा पाच जागांचा समावेश आहे.. आणि याच पाच जागांवर फक्त महायुतीनेच आणि ते हि फक्त दोनच नावं जाहीर केलीयेत .. त्यावरुनच लक्षात येईल की दोन्ही आघाड्यांवर उमेदवार निश्चिती किती आव्हानात्मक बनलीय.. मविआ आणि महायुती.. दोघांसमोर एकीकडे नाराजी आणि दुसरीकडे नव्या मित्रांनासोबत घेण्याचंही आव्हान आहे.. अशातच महायुतीला मात देण्यासाठी... आणि मतांचं विभाजन टाळण्यासाठी... मविआनं प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता.. आता तुम्ही म्हणाल की वचिंत आणि मविआची चर्चा सुरु आहे.. मग, तुम्ही भूतकाळात घडल्याप्रमाणे का बोलताय.. की युतीच्या शक्यतेला भुतकाळात नेण्याचं काम आम्ही नाही तर खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलीय.. पाहुयात..