Zero Hour Maratha Reservation : मनोज जरांगे यांचं आंदोलन ते G 20 शिखर परिषद झीरो अवरमध्ये चर्चा
abp majha web team | 08 Sep 2023 09:51 PM (IST)
दिल्ली सज्ज आहे, पाहुण्यांची वाट पाहत आहे... सगळ्या जगाच्या नजरा सध्या भारतावर आहेत...कारण 9 आणि 10 सप्टेंबर म्हणजे उद्या आणि परवा असे दोन दिवसं दिल्लीत G20 शिखर परिषद होणार आहे... जगातील अनेक देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान भारतीय भूमीवर एकाचवेळी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ. भारताने आपल्या पाहुण्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी केली आहे.. पण या सगळ्यात सर्वांच्या नजरा महासत्ता अमेरिकेवर खिळल्या आहेत. थोड्याच वेळापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं एअरफोर्स वन विमान दिल्लीत दाखल झालं आहे. जी-२० च्या बैठकीआधी आजच बायडन आणि मोदी यांच्यात आता चर्चा सुरु आहे. एकीकडे बऱ्याच देशांचे सर्वोच्च नेतृत्व हे भारतात येत असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी हे मात्र काल युरोपात पोहचले .. त्यांच्याबरोबर सॅम पित्रोदाहि आहेत.