Zero Hour Maharashtrian : मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी ते मराठा मोर्चा, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team | 12 Oct 2023 11:09 PM (IST)
महाराष्ट्रात जरी मुंबई असली तरी मुंबईत आता महाराष्ट्र शोधावा लागण्यासारखे दिवस आलेत. कारण मुंबईवर सुरुवातीपासूनच मराठींपेक्षा दुसर्या प्रांतियांनी हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतून मराठी टक्का कमी होण्याचे हेदेखील प्रमुख कारण म्हंटलं जातं. महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का, असा ठणकावून विचारणारा... घाटी म्हणून कधी समोर, तर कधी पाठीमागे बोलणार्या शेठचा रुबाब आता वाढू लागलाय. मांस खाणार्या मराठी माणसाला काही इमारतींमध्ये उघड उघड नो एन्ट्री आहे. मुंबईत यामुळे मराठी विरुद्ध गुजराती, मारवाडी असे चित्र दिसू लागले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुहृदय सम्राट अशा नेतृत्वाचा उदय मात्र ह्याच मुंबईतील मद्रासी विरोधातील वाचा आणि थंड बसा ह्या तीव्र स्वरूपाच्या भूमिकेतून झाला.