Zero Hour Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत घोटाळा, नांदेडमधील सेवा केंद्रावर 3 लाखांची फेरफार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनमस्कार मी विजय साळवी. झीरो अवरमध्ये आपलं स्वागत. नव्या आठवड्याची सुरुवात करुयात आज दिवसभरात गाजलेल्या सर्वात मोठ्या बातमीनं. तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एक घोटाळा झालाय. ही गोष्ट आहे एका सेंटरची आणि दोन गावांची. आणि त्या गावांमध्ये लाडकी बहीण योजनेत एक मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड झालीय. तसंच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या विक्रमी निर्णयांचीही माहितीही आज आपण घेणार आहोत. सोबतच राज्यातल्या अत्यंत महत्वाच्या बातम्यांचं विश्लेषणही करुयात.. पण, सुरुवात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं...
लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेली ही योजना... जितक्या घाईगडबडीत सरकारनं अमलात आणली... तितक्यात घाईगडबडीत लाभार्थी महिलांना निधीवाटपही सुरु करण्यात आलं.. आणि ज्या वेगानं लाभार्थी महिलांना पैसे मिळू लागले तितक्यात वेगानं ही योजना प्रसिद्ध झाली..
आता एखादी गोष्ट सुपरहिट झाली... ती त्यावरुन श्रेयवाद रंगतोच.. इथंही असंच झालं असं म्हणू शकतो.. कारण, महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांनी लाडकी बहीण योजना आपापल्या नेत्यांच्याच नावानं हायजॅक करण्याचे प्रयत्न केले.. जसं की तुमचा लाडका दादा म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचार सुरु केला तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी सुरु केली.. इकडे शिंदेंच्या सेनेनं योजनाच मुख्यमंत्री लाडकी बहीण करुन टाकली...
बरं, योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हा योजनेसाठी लाभार्थी बहिणींकडून इतकी कागदपत्रं कशाला हवीत.. ? सरकारचा बहिणींवर विश्वास नाही का? असं म्हणत विरोधकांनी आरोप केले.. तर घोषणेच्या महिन्याभरानंतरही लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत म्हणूनही विरोधकांनी टाहो फोडला.. आणि जेव्हा दोन हप्त्यांचं एकत्र वाटप झाले.. तेव्हा योजनेत मिळणाऱ्या प्रतिमहिना दीड हजार रुपयांवरुन विरोधकांनी आरोप केले.. पण तरीही योजनेची व्याप्ती आणि प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच होती.. एक दोन तक्रारी सोडल्या... तर ही योजना राज्यात योग्य पद्धतीनं सुरु होती.. त्यातच काल योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वाटपही सुरु झालं... आणि एक घोटाळा उघड झाला.. कुठे तर नांदेड जिल्ह्यात.
इथल्या हदगाव तालुक्यात मनाठा नावाचं गाव आहे.. इथल्याच सेवा सुविधा केंद्रावर लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाल्याचं उघड झालंय.. कसं ते सांगतो..
सचिन थोरात नावाच एक युवक.. याच मनाठा गावात सचिन मल्टिसर्व्हिसेस नावानं सुविधा केंद्र चालवायचा.. त्यानं रोजगार हमी... विहीर अनुदान वाटप.. वेगवेगळ्या सरकारी योजनांसाठी गावातील अडतीस पुरुषांची आधारकार्ड्स आणि बॅक डिटेल्स घेतली.. आणि मुलींच्या नावानं लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले... पुढे त्यानं काय केलं.. तर
अर्जावर फोटो मुलीचा.. नाव मुलीचं... बेसिक माहितीही मुलीचीच.. पण आधारकार्ड आणि बँक डिटेल्स मात्र... अडतीस पुरुषांचे.. तिकडे अर्ज भरले.. आणि काल हप्त्यांचे पैसे जमा होवू लागले..
मनाठा गावातील या सगळ्यांना तीन-तीन हप्त्यांची मिळून प्रत्येकी साडेचार हजाराची रक्कमही मिळाली.. काहींना तर कळलंच नाही की कोणत्या योजनेचे पैसे आहेत.. पण, गावकऱ्यांनी त्याचा शोध घेण्याआधीच या सचिन थोरातनं सगळ्यांना फोन करुन.. जमा झालेले पैसे काढून घेतले...
आणि तो फरार झाला..
काही तरुणांनी बँकेशी संपर्क साधला.. आणि त्यांना कळलं की घोटाळा झालाय. त्याच गावकऱ्यांच्या तोंडून ऐका..