✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : Kolhapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे :फेरीवाल्यांनी अडवले रस्ते, नागरिकांचं काय?

विजय साळवी, एबीपी माझा   |  21 Feb 2025 11:39 PM (IST)

मंडळी मोठी शहरं म्हटली की महानगरपालिका आलीच. मात्र आपल्याकडच्या महापालिका अनेकदा अधिकार नसलेले कागदी वाघ वाटतात. याचं कारण जे लोक नियम तोडून नागरिकांची प्रचंड गैरसोय करतात, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. विषय आहे फेरीवाल्यांचा. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांना अनेक वर्षांपासून फेरीवाल्यांचा विळखा पडलाय. आता या यादीत कोल्हापूर देखील येऊन बसलंय. महापालिका मात्र हतबल आहे.. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. 


कोल्हापूर. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं सुंदर शहर. या शहराला मात्र घरघर लागलीये.. याचं कारण फेरीवाले. 


खरंतर काही वर्षांपूर्वी कोल्हापूरमधील सर्व प्रमुख रस्त्यांचं रुंदीकरण करण्यात आलं. यासाठी तब्बल ४०० कोटींचा खर्च करण्यात आला. मात्र कोल्हापूरकरांना या रुंद रस्त्यांचा लाभ घेताच आला नाही. 


कारण पाहावं तिथं फेरीवाल्यांनी रस्ते आणि फुुटपाथ आडवलेत. त्यामुळे रस्ता जरी तीन किंवा चार लेनचा असला तरी नागरिकांना मात्र एक किंवा फार फार तर दीडच लेन वापरता येते. 


फेरीवाल्यांचा प्रश्न इतका गंभीर असूनही महापालिकेनं चक्क हतबलता व्यक्त केलीये 


फेरीवाल्यांचा त्रास कमी म्हणून की काय तर पार्किंगची समस्या देखील हाताबाहेर चालली आहे. पूर्वी बांधलेल्या घरांमध्ये पार्किंगची सोय नसल्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्या पार्क केलेल्या असतात. त्यामुळे केवळ चारचाकी चालकांनाच नाही तर दुचाकीस्वारांना देखील गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. 


एकूणच काय, नागरिकांनी मालमत्ता कर भरायचा, गाडी घेताना देखील विविध कर भरायचे, इंधन भरताना १०० टक्क्यांहून अधिक कर भरायचा आणि आयुष्यभर गैरसोयीत जगायचं... बहुधा हीच आता शहरी जीवनाची व्याख्या बनलीये.. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : Kolhapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे :फेरीवाल्यांनी अडवले रस्ते, नागरिकांचं काय?

TRENDING VIDEOS

Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया48 Minutes ago

Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच56 Minutes ago

Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....1 Hour ago

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं5 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.