Zero Hour : Kolhapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे : कोल्हापूरकरांना चांगले रस्ते कधी मिळणार?
Zero Hour : Kolhapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे : कोल्हापूरकरांना चांगले रस्ते कधी मिळणार?
तुम्ही पाहताय एबीपी माझा... आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर... मंडळी, झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत विविध शहरांमधल्या महापालिकेच्या महामुद्देमधील विशेष रिपोर्टस. त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात कोल्हापूरला. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे कोल्हापूर. अंबाबाईच्या दर्शनासाठी इथं दररोज हजारो भाविक देशभरातून येतात. त्यामुळं धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या शहराचे रस्ते कसे सुस्थितीत हवेत. पण तुम्ही जर आता कोल्हापूरला गेलात तर तुमची गाडी अनेकदा खड्ड्यात आपटल्याशिवाय राहणार नाही. रस्त्यांच्या या दयनीय अवस्थेमागची नेमकी कारणं काय, आणि महापालिका त्याबाबत काही करतेय का, हे जाणून घेण्यासाठी पाहूयात स्पेशल रिपोर्ट.