Zero Hour : पुन्हा रक्तरंजित जम्मू काश्मीर;अधिकाऱ्यासह चार जवान जखमी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : पुन्हा रक्तरंजित जम्मू काश्मीर;अधिकाऱ्यासह चार जवान जखमी जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील डेसा जंगलातील धारी गोटे उरारबागी येथे, सर्च ऑपरेशनदरम्यान.. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय सेनेच्या कॅप्टनसह चार जवानांना वीरमरण आलंय.. दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्याकडून या संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलंय.. जम्मूच्या डोडा येथे गेल्या ३४ दिवसांतील ही पाचवी चकमक आहे.. गेल्या काही दिवसांमध्ये कठूआ आणि जम्मूच्या जवळच्या परिसरात दहशतवाद्यांकडून सातत्यानं हल्ले होतायत.. दहशतवाद्यांनी आपला मोर्चा काश्मीर खोऱ्याऐवजी जम्मूकडे वळवल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढलीय.. या प्रकरणाकडे आपलं लक्ष असेलच.. तुर्तास झीरो अवरमध्ये आज इथेच थांबुयात.. उद्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटुयात.. पाहात राहा एबीपी माझा. भारताचं उत्तर टोक असणारं जम्मू काश्मीर गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या दहशतवादी कृत्यांनी हादरलंय... आता तर गेल्या महिनाभराचा विचार केला तर महिनाभरात तब्बल 7 हल्ले होऊन त्यामध्ये 13 जवान शहीद झालेत...