Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour : CSKला मिळाला धोनीचा वारसदार; मराठमोळ्या ऋतुराजवर मोठी जबाबदारी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : CSKला मिळाला धोनीचा वारसदार; मराठमोळ्या ऋतुराजवर मोठी जबाबदारी आयपीएलचा नवा कोरा सतरावा सीझन सुरु होत आहे आणि आज सीएसके म्हणजेच चेन्नई सुपर किग्जने अत्यंत सकारात्मक बातमी शेअर केली आहे.. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. एमएस धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही मोठी जबाबदारी ऋतुराजच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड 2019 पासून सीएसके संघासोबत आहे. २०२१ सालच्या आयपीएल मोसमापासून त्याच्याकडे भावी कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. त्या मोसमापासून ऋतुराज गायकवाड चेन्नईसाठी सातत्यानं धावांचा डोंगर उभारला. त्यानं आजवरच्या आयपीएल कारकीर्दीत बावन्न सामन्यांमध्ये एकोणचाळीसच्या सरासरीनं एक हजार सातशे सत्त्यान्नव धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट एकशे पस्तीस पॉईंट पाच दोन (135.52) एवढा जबरदस्त आहे.आयपीएलमधील कामगिरीच्या निकषावर ऋतुराज गायकवाडनं आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्याच नेतृत्त्वाखाली भारतानं एशियाडमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आपल्याला आठवत असेल या आधी एकदा धोनी ऐवजी जाडेजाकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली होती पण त्याने लगेच राजीनामा सुद्धा दिला होता.)) एमएस धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने पाच वेळा चषकावर नाव कोरलेय. तीच परंपरा कायम राखण्याचं आव्हान ऋतुराजसमोर असेल.