Zero Hour Harshvardhan Patil : सुळेंना अदृश्य मदत, हाती तुतारी ते इंदापूरची उमेदवारी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंदापुरातील मार्केट कमिटीच्या मैदानातला हा सोहळा... अनेक राजकीय अर्थांनी महत्वाचा आहे. पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी जवळून पाहिलंय. त्यांच्यासाठी इंदापूरचे शंकरराव पाटील हे नाव नवं नाही. महाराष्ट्रातही सहकार क्षेत्रात याच शंकरराव पाटलांचं नाव होतं.. दोन वेळा खासदार, सहा टर्म आमदार... कट्टर काँग्रेसी... अशी त्यांची ओळख.. बारामतीचे शरद पवार आणि इंदापूरचे शंकरराव पाटील... एकाच विचारसरणीचे नेते.. पण.. शंकरराव पाटलांना खुद्द शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत दोनवेळा पराभूत केलंय.. पाटील-पवार घराण्यात चार दशकांचा संघर्ष होता.. प्रामुख्यानं लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रानं हा संघर्ष अनेक वेळा पाहिलाय..
पुढे पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली.. आणि काँग्रेसमध्येच राहिलेल्या शंकररावांचा राजकीय वारसा त्यांच्या पुतण्याच्या खांद्यावर आला.. आणि तो पुतण्या म्हणजे हर्षवर्धन पाटील.
तेच हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून व्हाया भाजप आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले आहेत.. त्यांच्या स्वागतासाठी शंकरराव पाटलांच्या पुतळ्यासमोरच्या मैदानात शरद पवार उपस्थित होते. आज एक अख्खं राजकीय वर्तुळ पूर्ण झालंय..
हर्षवर्धन पाटलांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असताना... अनेक गौप्यस्फोट केले... जसा की... नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका... तेव्हा हर्षवर्धन भाजपमध्ये होते.. त्यांचा इंदापूर मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये मोडतो.. आता अपेक्षित होतं.. की हर्षवर्धन पाटलांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना मदत करणं अपेक्षित होतं.. पण, निकालानंतर कळलं की हर्षवर्धन पाटलांच्या इंदापुरातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना २५ हजारांची आघाडी मिळाली...
तेव्हा याची फार चर्चा झाली नाही... पण, आज इंदापुरातील सोहळ्यात... खुद्द हर्षवर्धन पाटलांनीच यावर मोठा खुसाला केला.. लोकसभेत बारामतीमधून सुनेत्रा पवारांविरोधात सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटील यांनी केला.... आणि शरद पवार हेच राजकारणाचे बिग बॉस असल्याचंही त्यांनी जाहीर केलं..