Zero Hour Guest Center : 'आमचे मित्रपक्ष अन्याय करताहेत' Harshvardhan Patil Exclusive
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Guest Center : "आमचे मित्रपक्ष अन्याय करताहेत" Harshvardhan Patil Exclusive
रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्यानंतर रात्री उशीरा सागर वर धडकले भाजप नेते इंदापूरचे हर्षवर्धन पाटील. बारामतीच्या राजकीय युद्धात दादांच्या विरोधातील अजून एक तगडे नेतृत्व. २०१९ च्या आधी हर्षवर्धन पाटील थेट भाजपमध्येच आले. आता अजितदादासुद्धा महायुतीत आल्यामुळे आणि बारामतीतून राष्ट्रवादी लढणार असल्याने हर्षवर्धन यांनाही हिशेब चुकता करायची संधी मिळाली. यात महायुतीचं नुकसान होत असल्याने दोघांचीही समजूत घालण्याची जबाबदारी फडणवीसांवर येऊन पडली. बारामती मतदारसंघाचा वाद मिटवण्यासाठी उशिरापर्यंत खलबत चालली. फडणवीस-हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यात जवळपास २ तास चर्चा झाली आणि अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात अखेर दिलजमाई झाल्याचं कळतंय.
दोघांमधे समेट जरी झाला असला तरी प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या अजितदादांसंदर्भात बऱ्याच अडचणी असल्याचे हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं.
त्यामुळे पुढच्या आठवड्यात इंदापूरच्या शिष्टमंडळाची भेट हि घेतल्या जाईल, तसेच इंदापूरचा दौरा करुन फडणवीस कार्यकर्ता मेळावा हि घेणार आहेत. कालच्या बैठकीत कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा आणि दक्षिण नगरला घेऊन ही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.