Zero Hour Gadchiroli Naxal : 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्रेकनंतर झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. आता बातमी पराक्रमाची.. नक्षल्यांच्या खात्म्याची..
कालची रात्र गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात महत्वाची ठरणारे... कारण, संततधार पाऊस... नदी नाल्यांना पूर... आणि सी - ६० जवानांच्या तुकडीचा भीम पराक्रम...
काल, रात्री गडचिरोली जिल्ह्यात सी-६० कमांडोंनी बारा नक्षलवाद्यांचा खात्मा केला... जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता.. त्यामुळे कारवाई मोठी आव्हानात्मक होती.. याबद्दल आज गडचिरोली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली... कालच्या कारवाईनंतर उत्तर गडचिरोलीत तब्बल 35 वर्षांनंतर सशस्र नक्षलवाद मुक्त झालाय... तिथं आता एकही सशस्त्र नक्षलवादी उरलेला नाही, अशी अतिशय महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिलीये. नक्षली शहीद सप्ताहच्या अनुषंगाने नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती... नक्षल्यांच्या खात्म्यानंतर जेव्हा सी सिक्स्टी पथक गडचिरोली पोलीस मुख्यालयात सुखरूप पोहोचले.. तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं... या ऑपरेशनमध्ये सहभागी सर्व २०० जवानांना, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ दिला...
1980 पासून नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 605 नागरिकांचा बळी गेलाय.. तर 242 पोलिसांना वीरमरण आलं... तसंच आतापर्यंत कमांडोंच्या धडक कारवाईत 344 नक्षलवादी ठार झाले असून, 500 पेक्षा जास्त नक्षल्यांनी सरेंडर केलंय... आणि घटनांचा आकडा पाहिला तर तो आहे.. 3 हजार 192 ..
यावरुनच लक्षात येतं की कालची मोहीम किती महत्वाची.. कालची नक्षलवाद्यांविरोधातली मोहीम कशी पार पडली... मोहिमेत किती जवान होते.. किती आव्हानात्मक होती ही मोहीम... हे सगळं आपण जाणून घेणार आहोत.. पण आता पाहुयात कालच्या धडक कारवाईचा एक मोंटाज...