Zero Hour Full : ठाकरेंची शाहांवर टीका ते पुणे आणि धुळ्यातील समस्या; झीरो अवरमध्ये सखोल चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Full : ठाकरेंची शाहांवर टीका ते पुणे आणि धुळ्यातील समस्या; झीरो अवरमध्ये सखोल चर्चा
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
उद्धव ठाकरेंनी गुरुवारच्या मेळाव्यात केलेल्या भाषणातील हे काही महत्त्वाचे मुद्दे होते. अमित शाहांवर बोचरी टीका, एकनाथ शिंदेंचा समाचार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील यथेच्छ तोंडसुख. या यादीत एक नाव मात्र प्रकर्षानं नव्हतं. ते नाव म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर जवळपास दोन महिन्यांनी, म्हणजेच ३१ जुलै रोजी उद्धव ठाकरेंनी आर या पारचा नारा दिला होता. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, या ठाकरेंच्या वक्तव्याची बरीच चर्चा देखील झाली. एवढंच नाही तर विधानसभेच्या प्रचारात ठाकरेंनी फडणवीसांना महाराष्ट्रद्रोही तर म्हटलंच, मात्र टरबूज असा उल्लेख करून त्यांची हेटाळणी देखील केली. मात्र केवळ चारच महिन्यात उद्धव ठाकरेंची राजकीय दिशा पूर्णपणे बदललेली दिसतेय.