Zero Hour Full : पोर्शे अपघातावरुन राजकारण ते विधानसभा निवडणुका; झीरो अवरमध्ये सखोल विश्लेषण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनमस्कार मी सरिता कौशिक.. झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. पुण्यातील पोर्शा कार अपघाताला आज बरोबर ११ दिवस पूर्ण झालेत.. गेल्या अकरा दिवसांमध्ये या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येतात ... आणि त्याला राजकीय किनार आहे.. खरं तर त्यातील काही बातम्यांना खुलासा म्हणायचे कि आरोप ... हे सुद्धा ठरवावे लागेल. सुरुवातीला आजचे हायलाईट्स..
पहिली गोष्ट - रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोन्ही डॉक्टरांवरची कारवाई...
ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सादर झालाय .आणि संध्याकाळी मंत्री हसन मुश्रीफांनी डॉक्टर अजय तावरेंसह त्याचबरोबर कंत्राटी डॉक्टर श्रीहरी हळनोरचं निलंबन केलं.. इतकंच नाही तर . ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळेंनाही सक्तीच्या रजेवर धाडलंयय.. आणि शिपाई अतुल घटकांबळेचं निलंबन आलंय...
तर आजची दुसरी गोष्ट - मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलिस आयुक्तांना कठोर आदेश..
पोर्शा दुर्घटना झाल्यापासून खास करून आधीच्या टप्प्यात पुणे पोलिसांच्या भूमिकेवर अनेक आरोप झालेत.. आज पुणे पोलिस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी फोन करत आरोपी कोणीही असेल.. किती मोठा असेल तरी योग्य ती कारवाई करा असे आदेशच दिलेत.. तर तिकडे पुणे पोलिसांची एक टीम ससूनमध्ये दाखल झाली.. त्यांनी तिथं तपासही केलाय.. आणि एक महत्वाची बाब समोर आली. ... अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी आरोपीचे वडील विशाल अगरवालने डॉ. अजय तावरेला १४ कॉल्स केल्याचे उघड झाले. ....
प्रकरणातली तिसरी गोष्टी - डॉक्टर अजय तावरेंचा गंभीर इशारा आणि त्यांच्यावरचे आणखी धक्कादायक प्रकरण...
विरोधक असो की शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्राचा अग्रलेख... सगळ्यांनी एक सुरात ससूनचे डॉक्टर अजय तावरे... यांनी चौकशीदरम्यान दिलेला जबाबाचा उल्लेख केलाय.. ‘मी सगळ्यांची नावे जाहीर करीन’ अशी धमकीच डॉक्टर अजय तावरेंनी दिलीय..असा उल्लेख अग्रलेखात करण्यात आलाय... तर अजय तावरेेंचा आणखी एक धक्कादयक प्रताप समोर आलाय.. ते तर बघायचे आहेच मात्र त्याच बरोबर डॉक्टर तावरेंचा करियर रिपोर्ट हा वेगवेगळ्या वेळी कसा डागाळलेला हेही आजच्या भागात पाहणार आहोत..
आता आजची चौथी गोष्ट - नाना पटोले आणि सुषमा अंधारेंचे गभीर आरोप... आपल्याकडील पुरावे आणि आणखी काही जणांची नावं उघड करु असा धमकी वजा इशारा देणाऱ्या डॉक्टर तावरेंच्या जीवाला धोका आहे असं म्हणत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी डॉक्टर तावरेंच्या सुरक्षेची मागणी केलीय.. ह्या प्रकरणाला अजून एक राजकीय कलाटणी देत सुषमा अंधारेंनी रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाच्या आडून भाजपला अजित दादा आणि शिंदे गटापासून फारकत घ्यायची आहे असाही दावा केलाय.. पाहुयात
सध्या आपण लोकसभेच्या निकालाकडे डोळे लावून बसलो आहोत... तरीही तुम्हाला माहितीय का की ही लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या एक-दोन पोटनिवडणुका सोडल्या तर महाराष्ट्रानं गेल्या दोन अडीच वर्षात जनतेतल्या मोठ्या निवडणूका पाहिल्याच नाहीयत.. विशेष करुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.. मुंबई महानगरपालिकेसह २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदांचा आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.
याचा दुसरा परिणाम म्हणजे या निवडणुका नाहीत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून विधान परिषदेवर नऊ जागा निवडून जातात, त्या सुद्धा दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. सगळीकडे प्रशासकाच्या हाती कारभार आहे. कितीही नाही म्हंटलं तर पाणी पुरवठा, स्वच्छता, घंटागाडी, नालेसफाई, शाळा, गणवेश, पुस्तक वाटप यावर परिणाम होऊन सामान्य नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. लोकल बॉडी नसल्याने छोट्या छोट्या कामांवर लक्ष ठेवणं कठीण बनतं. मुंबईचाच विचार केला तर नाले सफाई टेंडर कोण लक्ष देतंय? हा प्रश्न विचारला जातोय. राज्यपाल नामनियुक्त १२ जागांचा घोळ २०१९ मध्ये अचानक मविआ सरकार आल्यापासून सुरुच आहे. त्याही जागा अजून भरलेल्या नाहीत. आता हे आज सांगायचे कारण काय? तर या सगळ्या गोष्टींमुळे जूननंतर विधान परिषदेचे ७८ सदस्य संख्याबळ ५१ वर खाली येणार आहे.
आणि याच विषयावर आम्ही विचारला होता.. झीरो अवरमधील आजचा आपला दुसरा प्रश्न... तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरवर..