✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full On Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना अजित पवारांनी कोणता सल्ला दिला?

सलमान शेख   |  17 Feb 2025 09:37 PM (IST)

नमस्कार, मी विजय साळवी.. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झीरो अवरमध्ये आपलं स्वागत..

मंडळी... राजकारणात नैतिकता आहे का? किंवा कोणते राजकारणी नैतिकतेच्या आधारे निर्णय घेतात.. किंवा राजकारण करतात... ? असे काही प्रश्न मनात आले, तरी आपण तसे दहा-पंधरा राजकारणी सांगू शकणार नाही.. असो..

त्या प्रश्नाच्या जास्त खोलात न जाता... एका गोष्टीशी तुम्ही मात्र.. नक्कीच सहमत असाल... ती म्हणजे.. आज महाराष्ट्राच्याच नाही... तर देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तर.. तिथं तुम्हाला नैतिकतेची भाषा करणारे शेकडो राजकारणी दिसतील..

आता हे सारं ऐकून तुम्ही म्हणाल की नैतिकता शब्दाला घेऊन आम्ही इतकं काय सांगतोय... तर त्याचं कारण, समजून घेण्यासाठी आपल्याला दोन महिने मागे जावं लागेल..

मंडळी, ९ डिसेंबर २०२४... याच दिवशी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली होती.. आणि त्यानंतर या प्रकरणात एकापाठोपाठ एक असे गौप्यस्फोट झाले... इतकंच नाही तर मुख्य आरोपीचं नाव थेट अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंसोबत जोडलं गेलं... या सगळ्या घडामोडीत... विरोधकांपासून मित्रपक्षांमधल्या नेतेमंडळींनीही एकाच शब्दाचा वापर करून... धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.. आणि तो शब्द होता नैतिकता...

आता धनंजय मुंडेंचे नेते कोण तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार... ते आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्रीही आहेत... याच अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा त्यांनी नैतिकतेच्याच आधारे राजीनामा दिल्याचा इतिहास महाराष्ट्रानं पाहिलाय.. आणि आताही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप सुरु झाल्यानंतर याच नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा.. ही मागणी जवळपास सगळ्याच विरोधकांनी केली.. आता अजित पवारांनीही याच नेैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा सल्ला दिला..

वास्तविक याच अजित पवारांनी अगदी पहिल्या दिवसापासून आपली भूमिका अत्यंत स्पष्ट ठेवत.. मुंडे जर दोषी असतील तरच कारवाई करणार... हा पवित्रा घेतला होता.. अगदी मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांपर्यंत धनंजय मुंडेंना कोणतीही वेगळी ट्रिटमेंट देण्यात आली नाही.. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीतही धनंजय मुंडेंची वर्णी लागलीय... आणि त्यांना पक्षात प्रमोशन देण्यात आलं आहे... आणि त्यामुळंच अजित पवारांवरच्या टीकेची धार वाढली..

हे सगळं सुरु असतानाच आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी समोर आली.. आणि मग काय... महायुती सरकारवर चहुबाजूनं टीका वाढू लागली..

या सगळ्या घडामोडींमध्ये अजित पवारांनी नाशिक दौऱ्यावर असताना काल संध्याकाळी एक अत्यंत महत्वाचं विधान केलं.. त्याचाही आधार होती... नैतिकता..

पाहूयात अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय?

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full On Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना अजित पवारांनी कोणता सल्ला दिला?

TRENDING VIDEOS

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा4 Hour ago

Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत6 Hour ago

Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून6 Hour ago

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?17 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.