✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : केंद्रातील मंत्रिपदावरुन खदखद ते आगामी विधानसभा; झीरो अवरमध्ये सखोल विश्लेषण

सरिता कौशिक   |  10 Jun 2024 10:08 PM (IST)

नमस्कार मी सरिता कौशिक.. झीरो अवरच्या विशेष भागात आपलं स्वागत.. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला सुरुवात झाली.. आणि नरेंद्र मोदींनी काल पंतप्रधान शपथ घेत, माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा त्यांनी विक्रम केलाय.. इतकंच नाही तर सलग तिसऱ्यांदा बिगर काँग्रेसी पंतप्रधान होण्याचाही विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीेंनी केलाय..
खरंतर, यावेळी एकट्य़ा भाजपकडे संपूर्ण बहुमत नसलं तरी एनडीएच्या जोरावर नरेंद्र मोदींनी तिसऱ्या टर्मला सुरुवात केली.. आणि मोदींनी याच ऐतिहासिक टर्मची सुरुवात केली ती शेतकऱ्यांसाठीच्या अत्यंत महत्वाच्या निर्णयानं.. जो आपण पाहणार आहोतच ... पण त्या आधी कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे वळूया ... शपथविधी झाला जरी असला दिल्लीत, तरी त्याचे पडसाद उमटलेयेत महाराष्ट्रात ... ते नक्की काय आहेत हे पण आजच्या भागात बघायचंय 
तर सुरुवात करूयात राष्ट्रवादीच्या मंत्रिपदानं.. तुम्ही म्हणाल की, दादांच्या पक्षानं तर केंद्रातलं मंत्रिपद नाकारलंय.. तर हो.. तुम्ही एकदम बरोबर समजलात.. अजित पवारांना राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार.. अशी ऑफर होती... जी त्यांनी नाकारलीय.. आज सकाळपासून सोशल मीडियावर त्यामुळे एक प्रश्न फिरतोय .. जर बिहारमधील जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला  अजित पवारांप्रमाणेच लोकसभेची एक जागा जिंकून थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय, तर तोच न्याय अजितदादांना का नाही? यावरच आहे आपला आजचा पहिला प्रश्न.. तोच पाहण्यासाठी जावूयात.. पोल सेंटरला..


मांझी आणि अजितदादांना लावलेला निकष हा शिवसेनेलाही लागू होतो. फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच नाही तर शिवसेनेलाही एका राज्यमंत्रीपदावरच समाधानी राहावं लागलंय. याचा लगेच फायदा घेत विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगवताना दिसतायेत. आता हेच पाहा ना... बिहारमधील लोकजनशक्ती पक्ष रामविलासचे चिराग पासवान यांनी चारच जागा जिंकल्या.. तर त्यांच्या पक्षाला एक कॅबिनेटमंत्रीपद मोदी सरकारमध्ये मिळालं. इकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेेनं तब्बल ७ जागा जिंकूनही त्यांच्या वाट्याला केवळ एक राज्यमंत्रीपद आलंय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आपल्या वाट्याला आलेलं राज्यमंत्रीपद नाकारलंय..
दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सामंजस्याची भूमिका मांडली असली, तरीही मंत्रिमंडळाच्या शपथविधीला चोविस तासही होत नाहीत.. तोपर्यंत शिवसेना-राष्ट्रवादीतून नाराजीचा सूर उमटू लागलाय..
आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं. असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसंच अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं होतं, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी खदखद व्यक्त केली आहे. इतर राज्यातील घटक पक्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील घटक पक्षावर अन्याय झालाय. असंही बनसोडे म्हणालेत. पाहुयात

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : केंद्रातील मंत्रिपदावरुन खदखद ते आगामी विधानसभा; झीरो अवरमध्ये सखोल विश्लेषण

TRENDING VIDEOS

Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया8 Hour ago

Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच9 Hour ago

Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....9 Hour ago

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं13 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.