✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : लाडकी बहीण योजनेत घोटाळा ते लेबनॉनवर इस्त्रायलचे हल्ले,झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

विजय साळवी, एबीपी माझा   |  30 Sep 2024 10:58 PM (IST)

नमस्कार मी विजय साळवी. झीरो अवरमध्ये आपलं स्वागत. नव्या आठवड्याची सुरुवात करुयात आज दिवसभरात गाजलेल्या सर्वात मोठ्या बातमीनं. तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एक घोटाळा झालाय. ही गोष्ट आहे एका सेंटरची आणि दोन गावांची. आणि त्या गावांमध्ये लाडकी बहीण योजनेत एक मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड झालीय. तसंच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या विक्रमी निर्णयांचीही माहितीही आज आपण घेणार आहोत. सोबतच राज्यातल्या अत्यंत महत्वाच्या बातम्यांचं विश्लेषणही करुयात.. पण, सुरुवात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं...

लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेली ही योजना... जितक्या घाईगडबडीत सरकारनं अमलात आणली... तितक्यात घाईगडबडीत लाभार्थी महिलांना निधीवाटपही सुरु करण्यात आलं.. आणि ज्या वेगानं लाभार्थी महिलांना पैसे मिळू लागले तितक्यात वेगानं ही योजना प्रसिद्ध झाली..

आता एखादी गोष्ट सुपरहिट झाली... ती त्यावरुन श्रेयवाद रंगतोच.. इथंही असंच झालं असं म्हणू शकतो.. कारण, महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांनी लाडकी बहीण योजना आपापल्या नेत्यांच्याच नावानं हायजॅक करण्याचे प्रयत्न केले.. जसं की तुमचा लाडका दादा म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचार सुरु केला तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी सुरु केली.. इकडे शिंदेंच्या सेनेनं योजनाच मुख्यमंत्री लाडकी बहीण करुन टाकली...


बरं, योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हा योजनेसाठी लाभार्थी बहिणींकडून इतकी कागदपत्रं कशाला हवीत.. ? सरकारचा बहिणींवर विश्वास नाही का? असं म्हणत विरोधकांनी आरोप केले.. तर घोषणेच्या महिन्याभरानंतरही लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत म्हणूनही विरोधकांनी टाहो फोडला.. आणि जेव्हा दोन हप्त्यांचं एकत्र वाटप झाले.. तेव्हा योजनेत मिळणाऱ्या प्रतिमहिना दीड हजार रुपयांवरुन विरोधकांनी आरोप केले.. पण तरीही योजनेची व्याप्ती आणि प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच होती.. एक दोन तक्रारी सोडल्या... तर ही योजना राज्यात योग्य पद्धतीनं सुरु होती.. त्यातच काल योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वाटपही सुरु झालं... आणि एक घोटाळा उघड झाला.. कुठे तर नांदेड जिल्ह्यात.

इथल्या हदगाव तालुक्यात मनाठा नावाचं गाव आहे.. इथल्याच सेवा सुविधा केंद्रावर लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाल्याचं उघड झालंय.. कसं ते सांगतो..
सचिन थोरात नावाच एक युवक.. याच मनाठा गावात सचिन मल्टिसर्व्हिसेस नावानं सुविधा केंद्र चालवायचा.. त्यानं रोजगार हमी... विहीर अनुदान वाटप.. वेगवेगळ्या सरकारी योजनांसाठी गावातील अडतीस पुरुषांची आधारकार्ड्स आणि बॅक डिटेल्स घेतली.. आणि मुलींच्या नावानं लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले... पुढे त्यानं काय केलं.. तर
अर्जावर फोटो मुलीचा.. नाव मुलीचं... बेसिक माहितीही मुलीचीच.. पण आधारकार्ड आणि बँक डिटेल्स मात्र... अडतीस पुरुषांचे.. तिकडे अर्ज भरले.. आणि काल हप्त्यांचे पैसे जमा होवू लागले..

मनाठा गावातील या सगळ्यांना तीन-तीन हप्त्यांची मिळून प्रत्येकी साडेचार हजाराची रक्कमही मिळाली.. काहींना तर कळलंच नाही की कोणत्या योजनेचे पैसे आहेत.. पण, गावकऱ्यांनी त्याचा शोध घेण्याआधीच या सचिन थोरातनं सगळ्यांना फोन करुन.. जमा झालेले पैसे काढून घेतले...
आणि तो फरार झाला..

काही तरुणांनी बँकेशी संपर्क साधला.. आणि त्यांना कळलं की घोटाळा झालाय. त्याच गावकऱ्यांच्या तोंडून ऐका..


झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपलं स्वागत.  


आंतरराष्ट्रीय राजकारणातील ज्वालामुखी म्हणून ओळखला जाणारा पश्चिम आशिया पुन्हा धगधगतोय. गेलं वर्षभर गाझा पट्टीवर हल्ले करणाऱ्या इस्रायलनं काही दिवसांपासून आपलं लक्ष आता लेबनॉनवर केंद्रित केलंय. हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेला मूळापासून संपवणं हे इस्रायलचं लक्ष आहे. गेल्या तीन दिवसांत हिजबुल्लाचं नेतृत्व म्हणून ज्यांची गणना होते, त्या १३ पैकी १० म्होरक्यांना इस्रायलनं संपवलं. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्होरक्या म्हणजे हिजबुल्लाचा सरचिटणीस आणि सर्वेसर्वा हसन नसरल्ला. तो तर जमिनीखाली ६० फुटावर एका बंकरमध्ये बैठक घेत असताना मारला गेला. हिजबुल्ला याचा बदला घेईल, आम्ही जमिनी हल्ले करण्यास सज्ज आहोत, अशी गर्जना आज हिजबुल्लाचा उपाध्यक्ष शेख नईम कासिमनं केली. 


हा सगळा तपशिल आपण पाहणार आहोत, मात्र त्याआधी जाणून घेण्यासारखी बाब म्हणजे हिजबुल्ला या संघटनेमागे इराण आहे. इराण हा इस्रायलचा कट्टर शत्रू. मात्र आर्थिक निर्बंधांमुळे आर्थिकदृष्ट्या खिळखिळा झालेला इराण इस्रायलविरोधात प्रत्यक्ष युद्ध छेडू शकत नाही. म्हणून मग जसं पाकिस्तान अनेक दहशतवादी संघटनांच्या मार्फत भारताच्या खोड्या काढत असतो, तसंच हमास, हिजबुल्ला आणि हूथी या तीन संघटनांद्वारे इराण पडद्यामागून इस्रायलला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. 


सध्या लेबनॉनमध्ये काय सुरू आहे? इस्रायलची पुढची रणनीती काय असेल? या हल्ल्यांमुळे हिजबुल्ला खरंच संपेल का, आणि भारतावर या सगळ्याचा काय परिणाम होईल... हे सगळं आपण या सत्रात पाहणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता? त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : लाडकी बहीण योजनेत घोटाळा ते लेबनॉनवर इस्त्रायलचे हल्ले,झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

TRENDING VIDEOS

Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार22 Minutes ago

Shahaji Bapu Patil : मला अभिमान वाटतोय, सांगोला नगरपरिषदेव शहाजीबापूंची एकहाती सत्ता3 Hour ago

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report17 Hour ago

Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश17 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.