✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : फडणवीसांच्या राजकारणाचं नवं पर्व? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

विजय साळवी, एबीपी माझा   |  25 Dec 2024 10:56 PM (IST)

नमस्कार मी विजय साळवी.. एबीपी माझाच्या झीरो अवर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.


एबीपी माझाच्या जगभरातील तमाम प्रेक्षकांना नाताळच्या शुभेच्छा.. 


मंडळी.. २०२४ या सरत्या वर्षाचे आता अखेरचे अवघे सहा दिवस उरलेत.. त्यामुळं सारं जग... सध्या न्यू ईयर सेलिब्रेशनच्या मोडवर गेलंय..  मंडळी.. तुमचंही कदाचित पुढच्या पाच दिवसांचं प्लॅनिंग करुन झालं असेल... तुम्ही तुमच्या फेव्हरिट डेस्टिनेशनला पोहोचलाही असाल.. चला सुरुवात करुयात आजच्या झीरो अवरला...


मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरु झालाय असं म्हणायला हरकत नाही.. कारण, मी द्वेषाचं राजकारण करणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.. दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या मित्रांनाही सन्मानानं सोबत घेऊन.. त्यांनी महायुतीच्या नव्या सरकारचा गाडा हाकायला सुरुवात केलीय..
  
गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडीनं ज्यांना वारंवार टार्गेट केलं... ते देवेंद्र फडणवीस... मी पुन्हा आलो पण दोन दोन पक्ष फोडून आलो.. असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस... आता मी सत्तेत आलोय.. पण विरोधकांना योग्य सन्मान देऊ अशी भाषा वापरु लागलेत.. एक तर तू राहशील.. किंवा मी राहीन.. असं फडणवीसांना उघड उघड आव्हान देणारे उद्धव ठाकरेही नागपुरात थेट त्यांच्या भेटीला पोहोचले.. 


मंडळी या सगळ्या गोष्टी आम्ही का सांगतोय.. तर त्याला कारण आहे नागपुरात झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद...
 
नागपुरात आज नागपूर पत्रकार संघानं नव्या मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.. या कार्यक्रमातल्या औपचारिक सोहळ्यानंतर फडणवीसांनी पत्रकारांशी चर्चा केली.. त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली...
 
फडणवीसांच्या प्रत्येक उत्तरात कमालीचा राजकीय अनुभव दिसून येत होता.. खुद्द फडणवीसांनीही मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्या टर्ममध्ये आलेल्या अनुभवांचा उल्लेख करत... आपण कसे घडलो.. हे सविस्तर सांगितलं..
 
मंडळी.. देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद असेल.. आणि त्यांना शरद पवारांवर प्रश्न येणार नाही.. असं कधीच होणारच नाही.. तसंच झालं.. शरद पवारांच्या राजकीय स्टाईलवर प्रश्न विचारला.. तेव्हा फडणवीसांनी दिलेल्या उत्तरातून अनेक गोष्टी स्पष्ट होतायत... त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत.. पण आधी पाहूयात देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत?


 


मंडळी आजच्या अतिशय कटू आणि ध्रुवीकरण झालेल्या राजकारणात एकच नेता असा होता ज्यांचं नाव सगळेच आदरानं घेतात. आणि ते नाव म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. नेता, राज्यकर्ता आणि कवी सुद्धा... अटलजींची एक ओळख सांगणं शक्यच नाही. अटलजी भाजपचे सहसंस्थापक असून देखील आज काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष त्यांचं नाव अदबीनं घेतात. त्यांच्याबद्दल कुणी वाईट बोलतंय, कटू आठवणी सांगतंय असं कधीही होत नाही. याचं कारण म्हणजे अटलजी हे माणूस म्हणून उमदे होते, आणि सर्वांना अतिशय मायेनं वागवायचे. राजकीय मतभेद अलाहिदा, पण अटलजींनी कधी कुणावर वैयक्तिक टीका केल्याचं ऐकिवात नाही. अशा सर्वांच्या लाडक्या अटलजींची आज १००वी जयंती.. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, कारकीर्दीचा आणि हळव्या मनाचा एक धावता आढावा पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : फडणवीसांच्या राजकारणाचं नवं पर्व? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

TRENDING VIDEOS

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज6 Hour ago

England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report6 Hour ago

Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज7 Hour ago

Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report7 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.